नेतृत्व विकास साधण्यासाठी युवा संसद फायदेशीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ ऑगस्ट २०१९

नेतृत्व विकास साधण्यासाठी युवा संसद फायदेशीर

खंड विकास अधिकारी किरण कोवे 
तालुकास्तरीय युवक -युवती वक्तृत्व स्पर्धा
प्रथम विजेती नंदीता मोहोबे 
नागपूर / अरूण कराळे :
राष्ट्रउभारणीमध्ये युवाशक्तीचा विधायक सहभाग वाढविण्यासाठी युवा संसद कार्यक्रम युवा नेतृत्वाच्या विकासासाठी केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राज्य शासन राबवित असुन नेतृत्व विकास साधण्यासाठी आता युवा संसद फायदेशीर ठरणार आहे. या कार्यक्रमाची टॅगलाइन युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही अशी आहे . असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी किरण कोवे यांनी केले .

नागपूर पंचायत समीती अंतर्गत खाजगी अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही यावर आधारीत १५ विषय व योजनेवर वक्तृत्व स्पर्धा जि.प. माध्यमिक शाळा , काटोल रोड नागपूर येथे मंगळवार २० ऑगस्ट रोजी घेण्यात आली . त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते . व्यासपीठावर तालुका क्रिडा अधिकारी पवन मेश्राम , गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव , शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर , रामराव मडावी, प्राचार्या अनिता टोहरे उपस्थित होते . शासनानी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आपले विचार व अपेक्षा जाणून घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे विचार गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव यांनी प्रकट केले .

या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक बोखारा येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थींनी नंदीता मोहोबे , द्वितीय क्रमांक बुट्टीबोरी येथील सरस्वती किसान विद्यालयाची विद्यार्थींनी प्राची खरकाटे तर तृतीय क्रमांक वाडीतील गं . भा .शकुंतला देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थींनी आम्रपाली लोखंडे यांनी पटकाविला . या तीनही विद्यार्थींनींना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ , सन्मानचिन्ह व प्रथम तीन हजार , द्वितीय दोन हजार व तृतीय एक हजार रुपयांचा धनादेश देवून गौरविण्यात आले . या स्पर्धेत तालुक्यातील १७ कनिष्ठ महाविद्यालयापैकी ११ महाविद्यालयात १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट पर्यत ही स्पर्धा घेण्यात आली . त्यामधून ३० विद्यार्थी तालुका स्तरापर्यत पोहचले .

स्पर्धेचे परिक्षक म्हणून बलदेव राठोड , भारती नागपूरे , पुनम देशमुख यांनी काम सांभाळले .प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर , संचालन व आभार प्रदर्शन स्मीता पोटदुखे यांनी केले .


आयोजनासाठी गटसाधन केंद्र कार्यालयातील साधन व्यक्ती पप्पू मस्के , धनंजय बिसेन , राधा ताकसांडे, संतोष जाधव , बंडू रामटेके आदींनी सहकार्य केले .