चंद्रपूर:बुद्धगिरी टेकडीवरून समाजकंटकांनी बुद्ध मूर्ती नेली चोरून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ ऑगस्ट २०१९

चंद्रपूर:बुद्धगिरी टेकडीवरून समाजकंटकांनी बुद्ध मूर्ती नेली चोरून

चंद्रपुर/प्रतिनिधी:


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बुद्धगिरी टेकडीवरून काही समाजकंटकांनी चक्क बुद्ध मूर्तीच चोरून नेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे, या घटनेनंतर बौद्ध समाजबांधवात रोष पसरला असून अनेक अनुयायांनी तिथे मोठी गर्दी केली आहे.तेथील काही बौद्ध भिक्खू 20 तारखेला सकाळी वंदना करीत होते, त्यानंतर ते चंद्रपूर करिता रवाना झाले, त्यानंतर रात्री 10.30 वाजता बुद्ध मूर्तीकडे वंदना करण्याकरिता गेले असता तिथे मूर्ती दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध केली. मात्र मूर्ती मिळाली नाही. याची माहिती समाजबांधवांना मिळताच सर्व एकत्र झाले असून समाजबांधवात रोष पसरला आहे.