प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे विकासात्मक कामे होतात:नगराध्यक्ष प्रेम झाडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ ऑगस्ट २०१९

प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे विकासात्मक कामे होतात:नगराध्यक्ष प्रेम झाडे

नगर परिषद कर्मचारी श्रावण  इखनकर व
 मुख्याधिकारी राजेश  भगत यांचा  निरोप समारंभ
नागपूर /अरूण कराळे:
भाजपा ,शिवसेना ,बसपा , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील नगरसेवक विकासासाठी एकत्र येवून ठराव सर्वसंमतीने पास करतात . अठ्ठावीस नगरसेवकाची साथ आणि प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे विकासात्मक कामे होतात असे मनोगत नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले .
ग्रामपंचायतच्या कार्यकाळापासून आजपर्यत ३० वर्ष पर्यत सेवा देणारे नगर परिषदचे कर्मचारी श्रावणबाबू  इखनकर व वाडी नगर परिषद स्थापनेपासुन चार वर्ष प्रशासकीय काम सांभाळून वाडीचा विकास करणारे मुख्याधिकारी राजेश भगत यांचा वाडी नगर परिषदच्या वतीने बुधवार ३१ जुलै रोजी सत्कार समारंभ पार पडला . 
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम झाडे होते . आज पर्यत वाडीच्या विकासासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी जी मदत केली तीच मदत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना करून वाडीचा विकास करुन घ्या . आपसातील मतभेद सारून नवीन वाडी तयार करा . असे आवाहन पूर्व मुख्याधिकारी राजेश भगत यांनी केले . 

राजेश भगत व श्रावण इखनकर यांचा सर्वपक्षीय नगरसेवक ,सफाई कर्मचारी,ठेकेदार, नगर परिषदचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . यावेळी सत्कारमुर्ती श्रावणबाबू इखनकर , मुख्याधिकारी राजेश भगत , नगराध्यक्ष प्रेम झाडे ,उपाध्यक्ष राजेश थोराने, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले,उपमुख्याधिकारी आकाश सहारे,नगरसेवक केशव बांदरे ,नरेंद्र मेंढे, मनोज रागीट , शऋग्घसिंह परिहार , आशीष पाटील ,आशीष नंदागवळी ,मंजुळा  चौधरी,प्रमोद भोवरे,मंगला वाघमारे,अस्मिता मेश्राम,प्रज्ञा वासनिक , अवि चौधरी ,रोहीत शेलारे , आकांशा पाटील , प्रमोद निकाजू , प्रणाली लांजेवार ,योगेश जहागिरदार , मनोहर वानखडे ,संदीप अढावू , धनंजय गोतमारे , कपील डाफे , प्रदिप गभने , भारत ढोके , भिमराव जासुतकर , रमेश इखनकर, कमलेश तिजारे, आनंद भगत, चेतन तुरणकर, प्रीती बारवाल , रमेश कोकाटे , शैलेश अदीवारेकर, सुरज बाहेकर प्रामुख्याने उपस्थित होते . प्रास्ताविक मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले , संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांनी केले .