चांपा ग्रामपंचायतच्या सरपंचाकडुन कोल्हापूर पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ ऑगस्ट २०१९

चांपा ग्रामपंचायतच्या सरपंचाकडुन कोल्हापूर पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याची मदत

चांपा/प्रतिनिधी:


नऊ दिवसांच्या महापुरामुळे कोल्हापूरमधील अनेकांचे संसार, प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा तडाखा बसला. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी; शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, राजापूर, घालवाड, कुटवाड, कनवाड, आदी गावे आठवडाभर पाण्याखाली राहिली.व शिरोळ तालुक्यातील काही गावे आजही पाण्याखाली आहे .

विद्यार्थ्यांचे पुराच्या पाण्यामध्ये पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्यच वाहून गेल्याने शाळेला जायचे कसे?, असा प्रश्न जिल्ह्यातील शेकडो पूरग्रस्त विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला होता .सांगली कोल्हापूर पूरग्रस्त विद्यार्थांचे दप्तरच वाहून गेल्याने आता शाळेला जायचे कसे? असा प्रश्न पूरग्रस्त विद्यार्थांना  भेडसावत होता .

कोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक साहित्याच्या मदतीसाठी चांप्याचे सरपंच सरसावले .असून यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा तडाखा बसला. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी; शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, राजापूर, घालवाड, कुटवाड, कनवाड, आदी गावे आठवडाभर पाण्याखाली राहिली. पुरामध्ये प्रापंचिक साहित्यासह विद्यार्थ्यांची दप्तरे, शैक्षणिक साहित्य वाहून गेले. काही पाण्यात बुडून खराब झाले आहे.

 त्यामध्ये गुणपत्रिका, विविध प्रमाणपत्रेदेखील आहेत. ते पाहून अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावरण होत आहेत. शाळेला जायचे, तरी कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.  पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याची मदती करीता चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी उमरेडचे  तहसिलदार प्रमोद कदम 

 यांच्या माध्यमातून  शैक्षणिक साहित्याचा बॉक्स कोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थांना मदत म्हणून दिली .यावेळी मारोती वरठी, अनिल पवार , शिवशंकर राजपूत , राहूल राजपूत उपस्थित होते .