चंद्रपूरच्या लता मंगेशकर कला दालनात कपडे,भांड्यांचा मांडला खेळ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ ऑगस्ट २०१९

चंद्रपूरच्या लता मंगेशकर कला दालनात कपडे,भांड्यांचा मांडला खेळ

कला दालनात विकू लागले कपडे आणि भांडे 
                   ललित लांजेवार/नागपूर:

शहराच्या सांस्कृतिक कला वैभवातील एक देखणी वस्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह सध्या कपडे भांड्याची दुकान लावण्यासाठी व विकण्यासाठी मिळू लागले असल्याचे समोर आले आहे.अत्याधुनिक सुविधा नव्या युगाच्या स्पर्धेत वेगाने पुढे जाण्यासाठी चंद्रपूरच्या सांस्कृतिक चळवळीने, नाट्य निर्मितीने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल अश्या उद्देशाने बांधण्यात आलेय या कला दालनात कपडे व भांडे विकू लागल्याने चंद्रपूरचे नाट्यप्रेमी, व इतिहासतज्ज्ञ चांगलेच नाराज झाले आहे. या सभागृहात १२,१३,१४,ऑगस्ट रोजी कपडे व भांडे विक्री करिता खाजगी व्यक्तीला भाडेतत्वावर देण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . 

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे शासन असताना जिल्ह्याचे राज्याचे वन व अर्थ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून २००१ मध्ये या सांस्कृतिक सभागृहाची वास्तू उभी राहिली होती,जुलै २०१७ मध्ये या सभागृहाच्या नुतनीकरणासोबतच भारतरत्न लता मंगेशकर कलादालनाचे लोकार्पण सुद्धा यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या कलादालनामध्ये प्राचीण काळातील नाण्यांचा संग्रह असून देश-विदेशातील नाणे, मुद्रा प्रमुख आकर्षण आहे, प्रसिद्ध इतिहासतज्ञ अशोकसिंह ठाकूर यांनी या ठिकाणी हे नाणेसंग्रालय उभारले आहे.

 या नाणेसंग्रहाला भेट देण्यासाठी दररोज शेकडो लोक या ठिकाणी येत असतात, इतिहासतज्ञ अशोकसिंह ठाकूर योगदानाचा गौरवोल्लेख ना. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केला होता,हे कला दालन अत्याधुनिक सुविधा नव्या युगाच्या स्पर्धेत वेगाने पुढे जाण्यासाठी चंद्रपूरच्या सांस्कृतिक चळवळीने, नाट्य निर्मितीने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल या उद्देशाने आपण हे अत्याधुनिक नाट्यगृह शहरात तयार केले आहे,असे त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता मात्र शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव म्हणून बघितल्या जाणारा हा सभागृह कपडे भांडे विकायला दिल्याने नाट्यप्रेमी, व इतिहासतज्ज्ञ चांगलेच नाराज झाले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट रोजी प्रवीण कावेरी यांचा Heritage Art Exhibition असतो यंदा देखील Heritage Art Exhibition चे सिझन चौथे १५,१६,१७ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ वाजता दरम्यान भारतरत्न लता मंगेशकर कलादालना ठेवण्यात आले होते,या कार्यक्रमाला देखील दरवर्षी प्रमाणे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सकाळी उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत . काही नाट्यप्रेमी बुधावारी संध्याकाळी सभागृहात गेले असता सभागृहातील महागड्या पेंटिंगवर कपडे टांगून दिसले याच सोबत काही स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या वस्तू देखील विकायला ठेवण्यात आल्याचे दिसल्याने नाट्यप्रेमी नाराज झाले.

जागतिक छायाचित्रदिनानिमित्त पॉवरसिटी फोटोग्राफर्स क्‍लब चंद्रपूरच्या वतीने देखील तिसऱ्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे देखील आयोजन 19, 20 व 21 ऑगस्टला याच प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या लता मंगेशकर कला दालनात केले आहे. 

त्यामुळे सांस्कृतिक शैक्षणिक आणि शहराच्या इतिहासाबद्दल माहिती देणाऱ्या या कलादालनाचा वापर व्यवसायिक रुपाने वापर करून खाजगी व्यक्तीला देणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
अश्या प्रकारे जर सभागृह देण्यात येत असेल तर उद्या कोणीही त्याचा वापर खाजगी कामाकरिता करून आपली दुकान थाटणार यात काही शंका नाही ,सभागृह कोणत्या व्यक्तीला दिले पाहिजे,त्याच्या नियम आणि अटी नाहीत का? व्यवस्थापनाच्या अश्या या दुकान थाटू पणामुळे सभागृहाचा खेळ मांडला असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे आता या सभागृहाचा कसा वापर केला पाहिजे हेही आता सभागृह वाटप करणाऱ्या अधिकार्यांना शिकवावे लागणार का ? असे नाट्यप्रेमी बोलू लागले आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्याला काय समज देतील? किव्हा या संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई करतील ? ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.