बेरोजगार अभियंत्यांना महावितरण देणार लॉटरी पद्धतीने कामे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ ऑगस्ट २०१९

बेरोजगार अभियंत्यांना महावितरण देणार लॉटरी पद्धतीने कामे

मार्गदर्शन शिबिरात ५० अभियंत्याची उपस्थिती

 नागपूर/प्रतिनिधी:
 विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरण लॉटरी पद्धतीने मोठ्या प्रमाणात कामे देणार असल्याने विदुयत शाखेतील बेरोजगार तरुणांनी महावितरणकडे आपली नावे नोंदविण्याचे आवाहन नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी केले.
    काटोल रॊड येथील महावितरण कार्यालयात विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेमेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागातून ५० युवक उपस्थित होतेविदुयत परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रअनुभव या संदर्भात उपस्थित उमेद्वारांना नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी  माहिती दिली.
वीज विषयक कामे करताना आवश्यक असलेला विदुयत परवाना आता स्थानिक कार्यालयात मिळणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा विदुयत निरीक्षक प्रदीप चामट यांनी यावेळी  दिली.या अगोदर विदुयत परवाना मिळवण्यासाठी उमेदवाराने स्थानिक जिल्हा विदुयत निरीक्षक कार्यालयात अर्ज केल्यावर तो पुढील कारवाईसाठी मुंबई येथे पाठविल्या जात होतायात बराच कालावधी जात असल्याने यात बदल करून जिल्हा विदुयत निरीक्षक यांना यासाठी आवश्यक असणारे अधिकार नुकतेच प्रदान करण्यात आल्याने हा परवाना लवकर मिळणार आहे.
     विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक तरुण/तरुणींना महावितरणकडून १० लाख रुपया पर्यंतची कामे विना निविदा देण्याची तरतूद केली आहेही  कामे एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास लॉटरी पद्धतीने वाटल्या जातातपहिल्या वर्षात मिळालेली कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्याने मुदतीत  यशस्वीपणे पूर्ण केली तर त्यांना दुसऱ्या वर्षी प्रत्येकी १५ लाखरुपयांची कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्यात येतीलअशी माहिती महावितरणकडून उपस्थितांना देण्यात आली.
      विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक बेरोजगार अभियंत्यांसाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक सुरु केली असून त्या ठिकाणी उमेदवार माहिती भरून लॉटरी पद्धतीने कामे मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाहीयावेळी अधीक्षक अभियंता  बंडू वासनिककार्यकारी अभियंता अविनाश सहारेसंजय गिरीसहायक अभियंता जयेश कांबळे उपस्थित होते.