चंद्रपूर;अज्ञातांनी केला युवकावर तलवारीने हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०१९

चंद्रपूर;अज्ञातांनी केला युवकावर तलवारीने हल्ला

ललित लांजेवार/नागपुर:

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात शुक्रवारी रात्री उशिरा एका युवकावर सात ते आठ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला.या घटनेने शहरात  एकच खळबळ उडाली. सुमित रामटेके-२० रा. किल्ला वॉर्ड असे युवकाचे नाव असून घटनेनंतर हल्लेखोर झाले फरार झाले.या युवकाला उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे.

बल्लारपूर शहरातील  जुन्या वस्तीचा भाग असलेल्या गोल पुलिया परिसरात  ही घटना घडली. या परिसरातील अनेकांच्या डोळ्यादेखत झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.दरम्यान घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून सुमित रामटेके या वीस वर्षीय हल्ला ग्रस्त तरुणाला प्रथम बल्लारपूर ग्रामीण  रुग्णालयात दाखल केले यानंतर त्याची रवानगी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. 

अधिक रक्तस्त्राव व अत्यवस्थ प्रकृती लक्षात घेता सुमित रामटेके याला नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्याही त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. बल्लारपूर येथील ही घटना जुन्या वादातून उद्भवल्याची माहिती मिळाली असून हल्ल्याच्या घटनेला बारा तास उलटूनही या घटनेतील हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश आले आहे.

 हल्ल्यात आरोपी असलेल्या सर्वच युवकांना पुढच्या काही तासात जेरबंद केले जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.