सांगली व कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रपूरकर सरसावले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ ऑगस्ट २०१९

सांगली व कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रपूरकर सरसावले

पहिल्याच दिवशी ८ तासात जमा केली ३० हजाराची मदत 

ललित लांजेवार/नागपूर:


सांगली अन् कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, सोबतच सिनेकलावंत देखील,सारेच माणुसकी दाखवत पुरग्रस्ताना मद्त करत आहेत .


अश्या या आलेल्या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे सांगली - कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चंद्रपूरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवा मित्र फाउंडेशन आणि श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान,साई सेवा ग्रुप संस्था धावून आल्या आहे. या संस्थांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला चंद्रपूरकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .


या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील 4 दिवसांपासून सर्व चंद्रपूरकरांना सोशल मिडिया मार्फत पुरपीडितासाठी जुने नवीन कपडे व जीवनावश्यक वस्तूची मागणी केली होती,ज्यांना कोणाला सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी करावी अशी विनंती देखील या संस्थेने केली होती, बघता बघता सर्वस्थरातून भरभरून प्रतिसाद संस्थांना मिळाला.अश्यातच पहिल्याच दिवशी ८ तासात चंद्रपूरकरांनी माणुसकी दाखवत पूरग्रस्तांना ३० हजार रुपये मदत व काही जीवनावश्यक वस्तू जमा केल्या.


महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने चंद्रपूर जिल्ह्यातून मदत पाठवण्याचे ठरवले व तसे आवाहन शिक्षकांना केले, याला चांगला प्रतिसाद मिळाला व अवघ्या एका दिवसात 1 लाख रुपये मदत जमा झाली.


या दोम्ही संस्था आणखी ३ दिवसात १ लाख रुपये मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे,मिळालेल्या वस्तूंमधून एका कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या किमान वस्तूंचा संच बनविण्यात येत आहे, असे अनेक संच आणि इतर सर्व सामुग्री व पैसे कोल्हापूर व सांगली येथे या संस्थेचे पदाधिकारी स्वःता जावून देणार आहेत.

युवकांमध्ये सामाजिक जाणिव निर्माण होणे तसेच पूरग्रस्तांना मदत व्हावी या उद्देशाने युवा मित्र फाउंडेशन आणि श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान,साई सेवा ग्रुप संस्था वतीने हा निर्णय घेण्यात आला. या आधी देखील या दोन्ही संस्थेने अनेक ठिकाणी मदत केलेली आहे.

अशी करू शकता  तुम्ही मदत..
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवा मित्र फाउंडेशन आणि श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान,साई सेवा ग्रुप यांच्या पदाधिकार्यांना फोन लावू शकता किव्हा श्री शैलेश मोदी (मोदी सर)वासेकर पेट्रोलपंप मागे रामनगर चंद्रपूर तसेच श्री महेश काहीलकर जटपुरा वार्ड क्रं. २ सुपर बाजार जवळ चंद्रपूर येथे जावून सढळ हाताने मदत करू शकता. सोबतच सचिन गाटकीने ९८६००६६११९,महेश काहीलकर ९७६३२००९३३,विनोद गोवरदिपे ९४२२१३७१४५ या संस्थांच्या पदाधिकार्यांना देखील फोन वरून संपर्क करून मदत पोहचवू शकता.

गेल्या आठवडाभरापासून दुष्काळी प्रदेश वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. त्याची सर्वांत जास्त झळ पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्याला बसली आहे. याच पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे करण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे.सामाजिक जाणिवेतून काही स्वयंसेवी संघटनांनी राज्यभरातून पुरग्रस्तरांसाठी मदत गोळा करण्यास सुरूवात केली आहे.जरी तुम्हाला मदत दारायची असेल तर तुम्ही देखील या पत्यावर किव्हा फोनवरून मदत करू शकता.