चंद्रपुर;रेल्वेतुन मोबाईल चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ ऑगस्ट २०१९

चंद्रपुर;रेल्वेतुन मोबाईल चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन अटक


चंद्रपुर/ललित लांजेवार:
घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.शूभम निमगडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

त्याने रेल्वेतून चक्क १७ मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे.यासोबत लंपास केलेल्या दागिन्यांनी पैकी २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिणे चंद्रपूर पोलिसांनी जप्त केले आहे

या प्रकरणात त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे,  शूभम हा बाबूपेठ परिसरात असल्याची माहिती एलसीबीचे पथकाला मिळाली होती.  यावेळी त्याने चौकशीत शास्त्रीनगरात घरफोडी केल्याची कबुली दिली.तसेच बल्लारपूर-सेवाग्राम या मार्गाने धावणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले.

 १७ मोबाईल, ३२ ग्रॅम सोने, १० ग्रॅम चांदीचे दागिणे असा एकूण दोन लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.