73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ ऑगस्ट २०१९

73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

हबीब शेख/कोरपना:

कोरपना तालुक्यात 15 ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिनी’ स्वतंत्र्य भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालूक्यातील शाळा महाविद्यालय, सामाजिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी संस्था, उपविभागीय पोलीस कार्यालय गडचांदुर ,राजकीय क्षेत्रातून ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

शिवाजी इग्लीश मिडियम स्कुल नांदा च्या वतीने गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली होती. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्याथ्यी व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांकडून देशाला समर्पीत झालेले नेते आणि शहीदांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. संपुर्ण तालुक्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.