बांद्रा वरून मला 25 फोन आले:वडेट्टीवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ ऑगस्ट २०१९

बांद्रा वरून मला 25 फोन आले:वडेट्टीवार

चंद्रपुर/प्रतिनिधी:


सत्तापक्षाने विरोधकांचे आमदार चोरण्याचा सपाटा सुरू केला आहे अश्यातच मला बांद्रा वरून मला 25 फोन आले, त्यातील दोन फोन मी उचलले मात्र बाकीचे  फोन मी घेऊ शकलो नाही. असा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.


राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने भाजपाने एक विरोधी पक्षनेता नेल्यानंतर आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत नेण्याच्या खटपटी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितले. या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. 

मी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार आहे अशा बातम्या माध्यमावर आल्या मात्र हे चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट करत मी कुठेही जाणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.