विदर्भातील 16 लाख 40 हजार वीज ग्राहकांकडे 262 कोटींची थकबाकी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ ऑगस्ट २०१९

विदर्भातील 16 लाख 40 हजार वीज ग्राहकांकडे 262 कोटींची थकबाकी

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा:दिलीप घुगल

थकबाकी वसुली आक्रमकतेने करा

थकबाकी न भरणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा

वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची महावितरणच्या प्रणालीत नोंद घ्या

वसुलीत हयगय करणा-या अधिकारी, कर्मचा-याविरोधातही कठोर कारवाई
नागपूर/प्रतिनिधी:महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणा-या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 16 लाख 40 हजार वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी 262 कोटींची थकबाकी असल्याने ही थकबाकी पुर्णत: वसुल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहेत. 

घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकीसोबतच मागिल आर्थिक वर्षातील थकबाकी वसुल करण्यासोबतच थकबाकी भरण्यास नकार देणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची नोंद प्रणालीत करण्याच्या स्पष्ट सुचनाही प्रादेशिक संचालकांनी केल्या आहेत. प्रत्येक लाईनस्टाफ़ला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य द्या, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणा-या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचा-यांपर्यंत देण्याच्या सुचनाही दिलीप घुगल यांनी केल्या आहेत. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी रितसर नियोजन करून त्याची योग्य अंमलबजावणी करा, सोबतच वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या कर्मचा-यांचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. 

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल 16 लाख 40 हजार 97 वीज ग्राहकांकडे वापरलेल्या वीजबिलापोटी सुमारे 262 कोटी 19 लाख रुअपयांची थकबाकी असून यात अकोला जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 59 ग्राहकांकडे 34 कोटी 10 लाखाची, बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाख 4 हजार 943 ग्राहकांकडे 33 कोटी 68 लाख, वाशिम जिल्ह्यातील 91 हजार 315 ग्राहकांकडे 18 कोटी 16 लाख, अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार 485 ग्राहकांकडे 41 कोटी 22 लाख, यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 1 हजार 943 ग्राहकांकडे 33 कोटी 79 लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 13 वीज ग्राहकांकडे 17 कोटी 43 लाख, गडचिरोली जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 65 ग्राहकांकडे 10 कोटी 3 हजार, गोंदीया जिल्ह्यातील 83 हजार 545 ग्राहकांकडे 10 कोटी 24 लाख, भंडारा जिल्ह्यातील 88 हजार 466 ग्राहकांकडे 9 कोटी 63 लाख, वर्धा जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार ग्राहकांकडे 14 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी आहे, याशिवाय नागपूर जिल्ह्यांतर्गत असलेल्या नागपूर ग्रामिण मंडलातील 1 लाख 19 हजार 570 ग्राहकांकडे 20 कोटी 56 लाख तर नागपूर शहर मंडलातील 97 हजार 167 ग्राहकांकडे 18 कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी आहे.

नागपूर परिक्षेत्रांतर्गत वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने ग्राहकांनी त्यांचेकडील थकबाकीचा त्वरीत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे व कारवाई टाळण्याचे आवाहनही महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी केले आहे.