वाडी जि प शाळेच्या आवारात चिखल मातीचे ढिगारे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०१९

वाडी जि प शाळेच्या आवारात चिखल मातीचे ढिगारे  • न प इमारत बांधकाम ठेकेदाराची मनमानी
  • विद्यार्थ्यांना रोगराई होण्याचा धोका
  • पालक शिक्षक समितीचा संताप

वाडी/प्रतिनिधी  
पं स नागपूर अंतर्गत जि प उच्च प्राथमिक शाळा वाडी क्र 1 व 2 तसेच केंद्रप्रमुखांचे समूह साधन केंद्र कार्यालय असलेल्या परिसरात नगर परिषद वाडी च्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू असून शाळेच्या आवारात मोठया प्रमाणावर दगड मातीचे ढिगारे बांधकाम ठेकेदाराने पसरवून ठेवल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.


शाळेच्या परिसरात अंगणवाडी, कॉन्व्हेंट, शाळा व समूह साधन केंद्र कार्यालय असून लहान लहान बालके, शिक्षक व पालकांना दगड, मातीचे ढिगारे व चिखलाचा प्रचंड त्रास होत असून रस्त्यावर वाहणारे पाणी शाळेच्या आवारात साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून रोगाचा प्रादुर्भाव होऊन मुले आजारी पडत आहेत. शाळा मुख्यध्यपकांनी याबाबत बांधकाम ठेकेदारास अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.