विर नारायणसिंह ऊईके यांची राजुऱ्यात पुण्यतिथी साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

विर नारायणसिंह ऊईके यांची राजुऱ्यात पुण्यतिथी साजरीराजुरा/प्रतिनिधी 
येथे वीर नारायण सिंह उईके ह्यांची पुण्यस्तिथी साजरी करण्यात आली. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.  
विरनारायणसिंह ऊईके यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुतड्याला माल्यार्पण करण्यात आली. 
कार्यक्रमाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी समाज सेवक डाॅ. मधुकर कोटनाके यांनी आपल्या प्रबोधनातुन विर नारायनसिंह ऊईके यांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकले व आजच्या युवा पिढीने त्यांचे कार्य पुढे न्यावे व नागरीकांत रुजवावे असेही त्यांनी भाषनात सांगितले. 
यावेळी रमेश आडे, बंडु मडावी यांचीही भाषने झाली त्यांनी आपल्याभाषनातुन विर नारायणसिंह ऊईके यांचे कार्य व जिवनचरीत्रावर प्रकाश टाकुन सखोल माहीती दिली. आदिवासी समाजात विर नारायनसिंह ऊईके यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज असुन असे नेतृत्व निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असेही सांगितले. 
संचालन धिरज मेश्राम यांनी केले, तर आभार लक्ष्मण कुमरे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन  संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके, नितिन सिडाम, यांनी केले तर कार्यक्रमासाठी ऊध्दव टेकाम, संदिप ऊईके, खुशाल पेंदाम, मिंतु टेकाम, यांनी मेहनत घेतली.