मायणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आनंदा शेवाळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०१९

मायणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आनंदा शेवाळे
मायणी/प्रतिनिधी 
मायणी ता. खटाव जि. सातारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आनंदराव  शेवाळे यांची युवा नेते कार्यक्षम मा.स.सचिनभाऊ गुदगे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड  यापूर्वीचे उपसरपंच अॅड. सुरज शिवाजीराव पाटील  उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर . नवीन उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी उपसरपंच म्हणून आनंदराव यशवंत शेवाळे यांनी आपला अर्ज दाखल केला होता.  सूचक म्हणून अॅड. सुरज पाटील यांनी काम केले. उपसरपंच पदासाठी अन्य कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. या वेळी मायणीचे कार्यक्षम सरपंच व अध्यासी अधिकारी सचिन गुदगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.यावेळी उपसरपंच म्हणून आनंदराव शेवाळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक म्हणून एम. बी. चक्के ,सचिव म्हणून मायणीचे ग्राम विकास अधिकारी टी. एस. खाडे व तलाठी एस. व्ही. चाटे यांनी काम पाहिले.
     सदर वेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, सत्ताधारी गटाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते नूतन उपसरपंच आनंदा शेवाळे यांचा मानाचा फेटा, शाल, पुष्पहार हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे डॉ.दिलीप येळगावकर ,माजी उपसरपंच ॲड. सुरज पाटील व मायणी ग्रामपंचायतीचा नव्याने पदभार स्वीकारलेले ग्राम विकास अधिकारी एस.टी. खाडे यांचा सत्कार करण्यात आला .
       यावेळी बोलताना युवा नेते सरपंच सचिन गुदगे म्हणाले, मायणीच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनात आनंदराव शेवाळे यांचा मोठा सक्रिय सहभाग होता. यापुढच्या काळात देखील या पदाच्या माध्यमातून या पदाला न्याय देऊन ते गावच्या विकासाला अधिक प्राधान्य देतील. 
    नूतन उपसरपंच आनंदराव शेवाळे यावेळी म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून जी उपसरपंचपदाची जबाबदारी दिली आहे ती मा.आ.डॉ.दिलीप येळगावकर, युवा नेते स. सचिन गुदगे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली मायणीच्या विकासासाठी अधिक प्रयत्नशील राहीन. उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलाबाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला.