विमलनाथाच्या जयजयकारात जैन मुनींचे चातुर्मास प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जुलै २०१९

विमलनाथाच्या जयजयकारात जैन मुनींचे चातुर्मास प्रवेश

  • शोभायात्रे ने वेधले लक्ष 
  • लेझीम पथक, भजनीमंडळ, कलशधारी महिला
  • बँड पथक जैन स्तवनांनी दुमदुमले बळसाणे गाव
खबरबात गणेश जैन / धुळे
8888965296
बळसाणे : चातुर्मास निमित्त जैन मुनींच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यासाठी बळसाणे तीर्थाचे जनक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धनजी महाराज व सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचा ११ रोजी येथील ओम श्री विमलनाथ भगवान विश्वकल्याणक जैन तीर्थ येथे चातुर्मास प्रवेश झाला यानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भगवान विमलनाथ भगवान व महावीर भगवानाच्या जयजयकाराने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले
 परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धनजी महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचा बळसाणे नगरीत चातुर्मास होणार असून त्यासाठी मुनीश्रींचा गुरुवार ११ रोजी विश्वकल्याणक येथील विमलनाथ जैन मंदिरात मंगल प्रवेश झाला
  बळसाणे येथील गाव दरवाजापासून शोभायात्रे ला सुरुवात झाली या शोभायात्रेत कलशधारी महिला , भजनीमंडळ , लेझीम पथक , हाती ध्वज घेतलेले पुरुष सहभागी झाले होते यावेळी समाज बांधवांनी  विमलनाथ भगवान की जय , महावीर भगवान की जय , आज का दीन कैसा है , सोहने से भी मेहंगा है , वंदे विरम , जैनम जयती शासनम अशा नानातऱ्हेच्या घोषणांनी बळसाणे गाव दुमदुमून गेले होते सोबतच भजनीमंडळाने विविध प्रकारचे धार्मिक भजन गायीले तर बँड पथकाने तालव्रुध्द ढोल वाजवीत साथ दिली विश्वकल्याणक येथील विमलनाथ जैन मंदिरात शोभायात्रा पोहचून मुनीश्रींचा चातुर्मास प्रवेश झाला यावेळी बळसाणे येथील कवरलाल छाजेड , सुभाष कोचर , हेमचंद कोचर , सुरेश कोचर , भागचंद कोचर , अशोक कोचर , अरुण कोचर , विजय कोचर , गौतम कोचर , दिलीप कोचर , कांतीलाल कोचर , मोतीलाल खिंवसरा , हारकचंद छाजेड , किशोर कोचर ,आशिष रूणवाल किरण कुंमट , शांतीलाल खिंवसरा ,  दिपकभाई शहा ,कीर्ती शहा,रवी सुराणा, गौतम कुंमट ,यांच्यासह बळसाणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील विश्वकल्याणक जैन मंदिरात परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज विराजमान असून बळसाणे ग्रामस्थांनी व समाजबांधवांनी दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम श्री विश्वकल्याणक ट्रस्ट व ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन व जैन श्वेतांबर मुर्तीपूजक संघाच्या वतीने करण्यात आले आहे

मुनीश्रींच्या आगमनार्थ संबधे गाव एकवटले पण चातुर्मास प्रवेशात ट्रस्टगणांनी फिरवली पाठ

 बळसाणे तीर्थाचे जनक व गावातील जैन मंदिरासह विश्वकल्याणक तीर्थाचे शिल्पकार परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धनजी महाराज तथा सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचे चातुर्मास प्रवेशात गावकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती आणि त्या उपस्थिती चे कौतुक आज देखील समाजबांधवांतून होत आहे तसेच गावातील कै.एन.पी.जी.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषद शाळेतील लहानली मुल मुली शोभायात्रेत आकर्षक वाटत होते मुनीश्रींच्या प्रवेशाकरिता पुर्ण गाव एक सोबत एकवटले होते पण मुनीश्रींच्या प्रवेशात शितलनाथ संस्थानचे एकही ट्रस्टी ची उपस्थिती नव्हती व विश्वकल्याणकाच्या अकरा ट्रस्टगणातून फक्त महावीर जैन यांनी उपस्थिती दाखवून चातुर्मासाचे पुढील आयोजन ही गावातील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे  बळसाणे तीर्थाचे सर्वच ट्रस्टगणांनी मुनीश्रींच्या प्रवेशात अनुपस्थिती दाखवल्याची नाराजगी बळसाणे ग्रामस्थांसह समाजबांधवांनी केली आहे 

  मंगलमय चातुर्मासाचे प्रवचन

विश्वकल्याणक येथील पटांगणात चातुर्मासानिमित्ताने परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज प्रवचनातून म्हणाले की चातुर्मास म्हणजे काय ? , चातुर्मासा वेळी काय करावे , समाजामध्ये त्याचे किती महत्त्व आहे , जैन समाजात चातुर्मास पर्वाला अनन्य साधारण महत्व आहे याविषयी उपस्थितांना प्रवचनातून मार्गदर्शन केले या पर्वानिमित्त बळसाणे येथे परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचे आगमन झाले आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे पुढील चार महिने जैन समाज बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याकामी बळसाणे सरपंच दरबारसिंग गिरासे , उपसरपंच सुदाम खांडेकर,हिम्मत खांडेकर,देविदास धनुरे,नवल हालोरे,व ग्रा.पं.सदस्य , भजनीमंडळ , समस्त बळसाणे ग्रामस्थ आणि सकल जैन समाज ,कार्यक्रमाचे आयोजन  ट्रस्टी ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन, गिरीश कोचर,योगेश कोचर,चेतन छाजेड, परेश जैन, अभिषेक जैन, गौरव जैन, प्रशांत जैन, ललित जैन, पंकज जैन, यांच्या सह जैन मुनींचे स्वागतासाठी सज्ज होते व चातुर्मासा चे आयोजन समाजबांधवांकडून होत आहे.