तोंडात रुमाल कोंबून सोन्याचे दागिने लंपास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ जुलै २०१९

तोंडात रुमाल कोंबून सोन्याचे दागिने लंपास

जुन्नर /आनंद कांबळे 
CHOR साठी इमेज परिणाम - जुन्नर शहरातील भर वस्ती असणाऱ्या सदाबाजार पेठ येथील एका राहत्या घरात ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला त्यांच्या राहत्या घरात धुणीभांडी करणार्‍या महिलेने डोळ्यात काहीतरी टाकून, तोंडात रुमाल कोंबून, डोके भिंतीवर आपटुन जबरदस्तीने ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील एकूण १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. 
नलिनी दत्तात्रय गाटे( वय ७६ राहणार सदाबाजार पेठ ,जुन्नर) या ज्येष्ठ नागरिक महिला त्यांच्या घरात एकट्या राहत असून शुक्रवार दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजायच्या दरम्यान त्यांच्या घरी धुणीभांडी चे काम करणाऱ्या शोभा शंकर शेटे (राहणार सदाबाजार पेठ, जुन्नर) ही त्यांच्या घरी कामासाठी आलेली असताना तिने गाटे यांचे डोके भिंतीवर आपटुन, तोंडामध्ये रुमाल कोंबून, छातीवर पाय ठेवून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या ४ बांगड्या,२ पाटल्या,१ सोन्याचे गंठण आसा एकूण १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास केले. ज्येष्ठ महिला जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद त्यांनी जुन्नर पोलिसांकडे नोंद केली असून पोलिसांनी शेटे या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे, पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी करीत आहेत.