जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जुलै २०१९

जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपभंडारा/प्रतिनिधी 
गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या पवित्र उद्देशाने जनहित सामाजिक सेवाभावी संस्था भंडाराच्या वतीने आज दिनांक  ०२/०७/२०१९ला दत्तक ग्राम खापा (जंगल )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नोटबुक्स, पेन, पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष माननीय आनंदराव वंजारी माजी आमदार तसेच प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन सूर्यवंशी, के एन नान्हे, प्रा मोहोकर ,अंबादास  नागपुरे, दामोदर शिरसागर, सदाशिव बाणेवार ,अभिजित  वंजारी, प्रा मोहोकर मॅडम, प्रा बाणेवार मॅडम, श्री कर्डनायके उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के  एन नान्हे यांनी केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वगुण विकास होण्यासाठी त्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य मिळणे आवश्यक आहे तसेच या विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये अध्यापक आणि कुटुंबातील माता-भगिनीचा मोलाचा वाटा असतो अशा प्रकारचे मार्गदर्शन संस्था अध्यक्ष आनंदराव वंजारी यांनी केले कार्यक्रमाला शाळा समितीच्या हर्षा वरकडे, रत्ना सह्याम, सुनीता वरकडे, अरुणा वरकर्डे, मंदा वरकडे आणि गावातील पालक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापिक  लहाने मॅडम व आभार प्रदर्शन श्री पराते गुरुजी यांनी केले