इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

घुग्गुस येथील वेकोलिच्या म्हातारदेवी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

अथर्व संदीप मुळे वय (21) रा. म्हातारदेवी असे या युवकाचे नाव आहे. आईवडील सकाळी पुजापाठ करण्यासाठी घराबाहेर गेले असता त्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत गळफास लावुन आत्महत्या केली.आईवडील घरी पोहचताच त्यांना मुलाने गळफास लावल्याचे दिसले.तत्काळ त्याला घुग्गुस येथे राजीव रतन रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अथर्व हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता,तो इंजीनियरिंगचा विध्यार्थी होता,या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले ,आत्महत्येचे नेमकं कारण अजूनही समजू शकले नसून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.अथर्वच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली हात आहे.