इरई नदीवरील मार्ग दोन दिवसात सूरु करा अन्यथा पूलाचे काम बंद पाडू:जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जुलै २०१९

इरई नदीवरील मार्ग दोन दिवसात सूरु करा अन्यथा पूलाचे काम बंद पाडू:जोरगेवार

जोरगेवारांनी पुलाच्या बांधकामाची केली पाहणी
चंद्रपुर/प्रतिनिधी:


 63 कोटी खर्च करुन दाताळा जवळील इरई नदिवर पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामूळे नागरिकांसाठी येथे तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र तो रपटा पाण्याने वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी आज या पूलाची पाहणी करुन दोन दिवसात पर्यायी मार्ग बनवून येथील वाहतूक सुरु करावी अशी मागणी केली आहे. दोन दिवसात वाहतूक सूरु न झाल्यास पुलाचे काम बंद पाडू असा ईशारा जोरगेवार यांनी दिला आहे.

 चंद्रपूर ते दाताळा गावाला जोडणा-या मार्गावरील इरई नदीच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. जुन महिण्यात हे काम पुर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र अद्यापही या पूलाचे काम पूर्ण झालेले नाही. या मार्गावर शाळा, कॉन्व्हेंट तथा पॉलीटेक्नीक कॉलेज आहे. त्यामूळे येथून शाळेच्या बसेस मोठ्या प्रमाणात चालतात तसेच या मार्गावर असलेल्या गावातील नागरिकांनाही शहरात येण्याकरीता हाच मार्ग सोयीचा आहे.

 मात्र या पुलाच्या निर्माण कामा दरम्याण रहदारी साठी रपटा तयार करण्यात आला होता. पंरतू हा रपटा पाण्याने वाहून गेल्याने मागील 12 दिवसांपासून हा मार्ग चारचाकी व स्कूल बसेससाठी बंद करण्यात आला आहे. त्यामूळे विद्यार्थी व गावक-यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्याण आज यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी या पुलाची पाहणी केली यावेळी येथील अधिका-यासोबत जोरगेवार यांनी चर्चा केली. यावेळी दोन दिवसात येथे रपटा बनवून रहदारी सुरु करणार असे आश्वासन जोरगेवार यांना दिले. तसेच यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना जोरगेवार यांनी दूरध्वनी वरुन संपर्क साधत येथे ट्रॉपीक पोलिस तैणात करावे अशी मागणी केली. दोन दिवसात या मार्गावरील वाहतूक सुरु न केल्यास या पुलाचे बांधकाम बंद पाडू असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.


 यावेळी वंदना हातगावकर, संतोषी चौव्हाण, साहीली येरणे, विनोद अनंतवार, अल्का मेश्राम, माला पेंदाम, लता किनगावकर, जमीला मेश्राम, विजया बच्छाव, कलाकार मल्लारप, इमरान खान, तिरुपती कारंगुला, बबलू मेश्राम, मुन्ना जोगी यांच्यासह स्थानीक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती