चांपा ग्रामपंचायतीने वृक्षदिंडी काढून केली १२०० रोपटयाची लागवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जुलै २०१९

चांपा ग्रामपंचायतीने वृक्षदिंडी काढून केली १२०० रोपटयाची लागवड

चांपा/प्रतिनिधी:राज्य शासनाच्या ३३कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत चांपा ग्रामपंचायत,विजय विद्यालय , जिल्हापरिषद शाळा  वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज चांपा येथे ३५००रोपटयाची लागवडीचा संकल्प घेऊन १२००रोपटयाची लागवड   करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण  जिल्हापरिषद सभापती पुष्पाताई वाघाडे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून , उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी ए.के .मडावी , व सरपंच अतिश पवार आइडीबीआय बँकचे शाखा प्रमुख अश्विनी डोंगरे यांच्या हस्ते आज चांपा येथे वेगवेगळ्या स्थानी वृक्षरोपण करून वृक्ष लागवडीला सुरवात झाली .विजय विद्यालयचे विद्यार्थी व शास्त्रसेना पथकचे विद्यार्थी व जिल्हापरिषद शाळेचे विद्यार्थी , ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ , तनिष्का गटातील महिला  ,व  वनविभागातील कर्मचारी मार्फत आज चांपा येथे वृक्षदिंडी संपुर्ण गावात भ्रमण करून ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत रैली काढून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जागवा संदेश देत ३५००हजार वृक्ष लागवडीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हापरिषद सभापती पुष्पाताई वाघाडे यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या आवारात वृक्षरोपण करून वृक्षलागवडीला सुरवात झाली .यावेळी बोलतांना उत्तर उमरेड वनपरीक्षेत्र अधिकारी ए .के .मडावी यांनी ग्रामपंचायतने राज्य शासनाने ३३कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेणे चांपा ग्रामपंचायत मार्फत ३५००वृक्ष लागवडीचा संकल्प घेत आज १२००रोपट्यांची लागवड केली सरपंच अतिश पवार यांचे वृक्ष लागवडीसाठी राबवलेल्या उपक्रमाची 
स्तुती करून ३५००वृक्षचे संगोपन व सरक्षीतता व्हावी .यासाठी विषेश प्रयत्न ग्रामपंचायत मार्फत करावे व सोबतच  ग्रामस्थांनी वृक्षसंगोपन करावे असे आवाहन सुध्दा केले .

सरपंच अतिश पवार यांनी मार्गदर्शन करतेवेळी चांपा येथील नागरिकांना या वृक्ष लागवडीचा फायदा मिळणार आहे .याकरिता समस्त गावकऱ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी सहकार्य करावे , असे आवाहन त्यानी यावेळी केले .याप्रसंगी जिल्हापरिषद सभापती पुष्पाताई वाघाडे यांनी वृक्षसंवर्धनामुळे होणारे फ़ायदे चांपा गावाला  हरित गावाचा दर्जा प्राप्त झाला पाहीजे म्हणून नुसतं वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन सुध्दा करावे असे मार्गदर्शन केले .

याप्रसंगी वनविभाग मकरधोकडा वन अधिकारी मेश्राम , उपसरपंच अर्चना सिरसाम , तनिष्का गट प्रमुख मिराबाई मसराम , ग्रामसेवक सुनील तायवाडे , विजय विद्यालय मुख्यध्यापक नागदेवे , जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक येरखेडे , आयडीबीआयचे शाखा प्रबंधक अश्विनी डोंगरे , आदीवासी युवा सेनेचे कार्यकर्ते आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी , वनविभाग कर्मचारी  उपस्थित होते .