श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा १ ऑगस्ट रोजी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०१९

श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा १ ऑगस्ट रोजी

पुण्यप्रसून वाजपेयी यांची उपस्थिती

चंद्रपूर/प्रतिनिधी:


 चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या कर्मवीर पुरस्कारासह विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण १ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राहणार असून, यावेळी ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक पुण्यप्रसून वाजपेयी प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर दिवंगत पत्रकार, श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्ष सूर्यकांत जैन यांना मरणोत्तर कर्मवीर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 सोबत श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ग्रामीण विकासवार्ता, शुभवार्ता, मानवी स्वारस्य अभिरुची कथा, इलेक्ट्रॉनिक मीडिया , हौशी छायाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.