वाडीची शुभांगी तारेकर मिसेस भोपाल पुरस्काराने सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जुलै २०१९

वाडीची शुभांगी तारेकर मिसेस भोपाल पुरस्काराने सन्मानित

मिसेस सेंट्रल इंडिया २००१९  सेमी फायनल संपन्न

नागपूरच्या ग्रँड फिनाले स्पर्धेत प्रवेश

नागपूर / अरूण कराळे:सिनेस्टेप मंच द्वारा मिस अँड मिसेस सेंट्रल इंडिया २०१९  ऑडिशन चे सेमिफायनल स्पर्धा संपन्न झाली.यांमध्ये वाडी नागपूरची श्रीमती शुभांगी विकास तारेकर हिने भोपाल विनरचा पुरस्कार प्राप्त करून नागपूरचे नाव लौकिक करीत येत्या २१  जुलै रोजी  नागपूर येथील सुरेश भट्ट सभागृहात आयोजित ग्रँड फिनाले स्पर्धेत स्थान मिळविले.


याबाबत सर्वस्तरातून शुभांगीचे  अभिनंदन केले जात आहे. सिनेस्टेप द्वारा आयोजित कार्यक्रमाचे ऑडिशन हैद्राबाद,सातारा,पुणे,रायपूर,नाशिक,नागपूर,भोपाल आदी सात शहरात घेण्यात येऊन ५७५  स्पर्धकांनी यांमध्ये सहभाग नोंदविला आहे . त्यातील ४५ स्पर्धकांनी फॅशन शो कॉन्टेक्स मधील टॅलेंट राऊंड मध्ये आपले स्थान निश्चित केले.सात जिल्ह्यात सिनेस्टेप तर्फे ऑडिशन घेण्यात आले तेंव्हा फॅशन शो सोबतच स्पर्धकांनी आपल्या मधील विविध सुप्तगुणाचा परिचय करून देत विजयी स्पर्धकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्याची माहिती फिल्म डायरेक्टर अनिल सहाने  उपरोक्त स्पर्धेत वकील,पोलीस,शिक्षक आदी पेशातील महिलांसोबतच इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.


कार्यक्रमाकरिता पंच म्हणून गोंदिया येथील मेकअप आर्टिस्ट तृप्ती मेश्राम,अखिलेश माने, २०१८  च्या रनअप विजेता नम्रता जयानी,अभिनेत्री कविता लांजेवार आदींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.यावेळी दिग्दर्शक अनिल सहाणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून फिल्म सिटी संदर्भात विस्तृत माहिती देत विविध मॉडेलना पुरस्कार देऊन सन्मानित केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रसिका श्रीवास यांनी मोलाचे सहकार्य केले.