आयुध निर्माणी बचाव, निर्गमीकरण हटाव चे नारे देत महिला पुरुषांनी काढला भव्य पायदळ मोर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

आयुध निर्माणी बचाव, निर्गमीकरण हटाव चे नारे देत महिला पुरुषांनी काढला भव्य पायदळ मोर्चा

वरिष्ठ महाव्यवस्थापकामार्फत सरकारला पाठवले निवेदन
अनिश्चितकालीन संपाचा दिला ईशारा
नागपूर / अरूण कराळे

 भारत देशात असणाऱ्या ४१  आयुध निर्माणी कारखान्यांचे  खासगीकरण निगमीकरण करण्याच्या नीती व निर्णया विरोधात अंबाझरी, डिफेन्स येथे गत चार दिवसांपासून सतत निदर्शने, पायदळ मोर्चा , जाहीर निषेध सभा या स्वरूपात तीव्र आंदोलन सुरु आहे.हातात निषेधार्थ फलक,आपापल्या संघटनांचे ध्वज,लाल टी-शर्ट घालून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करून कर्मचाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.


 या आंदोलनात आयुध निर्माणी अंबाझरीतील रेड युनियन, इंटक युनियन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ व लोकशाही कामगार आघाडी आपसातील मतभेद बाजूला सारून कर्मचारी व देशाच्या हिताकरिता एकत्रित येऊन सरकारच्या विरोधात उभे राहिले आहेत.

 सोमवार २२ जुलै पासून सुरू असलेल्या आंदोलनात शुक्रवारी पुरुष कर्मचाऱ्यांसोबतच आयुध निर्माणीतील महिला  कर्मचाऱ्यांनीही आपला सक्रीय सहभाग नोंदवला.भर पावसात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी निषेधाचे फलक,ध्वज हाती घेऊन पायदळ मोर्चा काढून सरकारच्या कामगार विरोधी निर्णय व धोरणांच्या विरोधात घोषणा देत आपला तीव्र रोष प्रकट केला.

उपस्थित कामगार संघटनांचे नेते बी.बी.मुजुमदार, गिरीश खाडे, बंडू तिडके,विनोद कुमार,आशिष पाचघरे,दीपक गावंडे, क्षीरसागर, विनोद रामटेके, इंटकचे प्रवीण महल्ले, अरविंद सिंह, अंजूम, ओ.पी.उपाध्याय, ब्रिजेश सिंह,संजय वानखेडे, आर.पी.चावरे,जगदीश गजभिये, वेदप्रकाश सिंह,अविनाश रंगारी, सुदर्शन मेश्राम, सतीश बागडे इत्यादींसह हजारोंच्या संख्येने कर्मचारी भर पावसात शुक्रवारी २६ जुलै रोजी पायदळ मोर्चा काढून  आयुध निर्माणीतील वरिष्ठ महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात धडकले.

वरिष्ठ महाव्यवस्थापक यांना आयुध निर्माणी कारखान्यांचे निर्गमीकरण व खासगीकरण रद्द करणे,फॅक्टरीचे सशक्तीकरण करणे,कार्यभार वाढवणे इ. मागण्यांचे निवेदन  दिले . हे निवेदन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यापर्यंत पोहोचण्याची विनंती केली. यानंतरही मागण्या पूर्ण न केल्यास देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला गेला.