अस्वलीचा महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला:हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जुलै २०१९

अस्वलीचा महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला:हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी

मुल/रमेश माहुरपवार:


मूल येथील कर्मवीर महाविदयालयातील विद्यार्थीनी कुमारी नीशा नारायण सोनुले ही विधीकरिता गेली असता तिथे दबा धरून बसलेल्या अस्वलीने निशावर हल्ला केला.निशा सोनुले असे या जखमीविद्यार्थीनीचे नाव आहे. निशा ने आरडाओरड केल्याने तिचा सोबतीचा मैत्रीणी धावून आल्या.


 मंगळवारी सकाळी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान हि घटना घडली सर्वांनी अस्वलीला हुसकावीण्याच्या प्रयत्न केल्याने निशा बचावली. महाविद्यालय प्रशासनाकडून वनविभागाला सदर घटनेची माहिती देण्यात आली. अस्वलीच्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थीनी निशा वर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. 

मात्र जखम गंभीर असल्याने वनविभागाचा वाहनाने पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटना गंभीर असून यापूर्वी ही महाविद्यालय परीसरात अस्वलं आणि ईतर वन्य प्राणी आढळून आल्याची माहिती महाविद्यालयाने वनविभागाला दिली. परंतु वनविभागाने त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा आहे.