हंसराज अहीर भाजपाच्या राष्ट्रीय सह निवडणुक अधिकारीपदी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जुलै २०१९

हंसराज अहीर भाजपाच्या राष्ट्रीय सह निवडणुक अधिकारीपदी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

हंसराज अहिर साठी इमेज परिणाम
भाजपाच्या राष्ट्रीय सह निवडणुक अधिकारी पदी हंसराज अहीर ,केंद्रीय
गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शाह यांनी केली नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमितजी शाह यांनी संघटनात्मक निवडणुकीच्या संचलनासाठी राष्ट्रीय निवडणुक अधिकारी सह निवडणुक अधिकांऱ्यांच्या नियुक्त्या घोषीत केल्या आहेत.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अहिर यांना राज्यसभेत स्थान देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगितल्या जात होते मात्र तत्पूर्वी अहिर यांना भाजपाच्या राष्ट्रीय सह निवडणुक अधिकारी पदाची पक्षाकडून जबाबदारी देण्यात आली आहे 

या नियुक्‍तीपत्रानुसार श्री. हंसराज गंगाराम अहीर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांची सह निवडणुक अधिकारी या पदी राष्ट्रीय अध्यक्षांनी नियुक्‍ती केली आहे.

या नियुक्‍तीबद्दल वित्त व वनमंत्री , महाराष्ट्र शासन, मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार ,डॉ.उपेंद्र कोठेकर, आ. नानाभाऊ शामकुळे, आ. संजय धोटे, आ. संजीव रेड्डी, आ. राजु तोडसाम ,राजेंद्र डांगे, संजय देवतळे, हरिश शर्मा, विजय राऊत , खुशाल बोंडे, महापौर अंजलीताई घोटेकर,उपमहापौर अनिलभाऊ फुलझेले, राहुल सराफ, राजेश मुन, व इतर भाजपाचे लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे .