महापौर अंजली घोटेकर यांनी केले विठ्ठल रुक्माई वारकरी दिंडीचे स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ जुलै २०१९

महापौर अंजली घोटेकर यांनी केले विठ्ठल रुक्माई वारकरी दिंडीचे स्वागत

 चंद्रपूर/प्रतीनिधी:

संम्पूर्ण महाराष्ट्रात श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषात आषाढी एकादशी साजरी करण्यात येते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई आहे. यांना मिळण्याकरिता सर्व वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ओढ असते. चंद्रपुरात हि मिनी पंढरपूर या नावाने ओढखलेला प्रसिद्ध नाव म्हणजे चंद्रपूर - घुग्गुस मार्ग लगत वढा येथे मानला जाते. 

त्या वढा ला जाण्याकरिता सर्व दिंडी निघाल्या होत्या आणि ती दिंडी चंद्रपूर जातांना त्याचे स्वागत महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. व सोबतच महाराज यांना वृक्ष देऊन त्यांचे हि स्वागत करण्यात आले. नाचत - गात या दिंडी मधून सर्व वारकऱ्यांनी भाग घेतला होता. भजन - कीर्तन, जय हरी विठ्ठल, ज्ञानदेव - तुकाराम या जयघोषाने वारी समोर निघाली. 

या प्रसंगी नगरसेवक नगरसेविका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.