नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या हस्ते बोअरवेलचे उद्घाटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जुलै २०१९

नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या हस्ते बोअरवेलचे उद्घाटन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

पाण्याची समस्या लक्षात घेता नगरसेवक विशेष निधीतून विठ्ठल मंदिर प्रभागात बनविण्यात आलेल्या बोअरवेलचे उद्घाटन नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिनादेवी देव, विश्रांतीताई पडगेलवार, नंदाताई गर्गेलवार, मनीषा ठाकरे, मंगला पडगेलवार, रंजना धर्मेजवार, वीणा गर्गेलवार, प्रियंका बंदूरकर, सुनिता पडगेलवार, राहुल पाल, सुभाष पडगेलवार यांची उपस्थिती होती.

यंदाचा उन्हाळा चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी पाणी संकट घेऊन आला. पाण्या अभावी नागरिकांचे येथील नागरिकांना प्रचंड हाल झाले आहे. पाणी कपातीचा प्रभाव विठ्ठल मंदिर प्रभागातही दिसून आला आहे. पाण्यासाठी चांगलीच पायपीठ कारवाई लागल्यामुळे प्रभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी नगरसेवक त्यांच्या हस्ते या बोअरवेलचे नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी आपल्या प्रभागात नगरसेवक निधीतून बोअरवेल उभारली प्रभागात बोअरवेल आल्याने काही प्रमाणात का होईना पाणी समस्या सुटेल या आशेने स्थानिकांमध्ये उत्साह आहे. प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहील असी ग्वाही लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलतांना निंबाळकर यांनी दिली.