नागपुरात पोलीसांवर गुंडांचा हल्ला,पोलीसांची सीआर गाडी फोडली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जुलै २०१९

नागपुरात पोलीसांवर गुंडांचा हल्ला,पोलीसांची सीआर गाडी फोडली

जिव धोक्यात घालून पोलिसांनी अज्ञात मुलीला वाचविले,

मात्र मुलगी पळून जाण्यास यशस्वी ठरली
नागपूर/अरूण कराळे:

एका मुलीला मारहाण करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर एका कुख्यात गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने दगडफेक करून त्यांना जखमी करून शासकीय वाहनांची तोडफोड केल्याची घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडी नाका नं.१० पासून वायु सेना कडे जाणाऱ्या मार्गावर सोमवार २२ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सतीश आणि शैलेश हे एका मुलीला घेऊन वाडी हद्दीतील वायुसेना गेटच्या मागील रस्त्यावर बसले होते. कसल्यातरी कारणावरून त्यांचा मुलीसोबत वाद झाल्याने दोघांनीही तिला मारहाण करायला सुरुवात केली. कुणीतरी ही माहिती शहर नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस सुरेश मांढरे व नितीन करडभाजने हे घटनास्थळी गेले.

 पोलीस त्यांना विचारपूस करीत असताना सतीशने शिपाई नितीनची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे शैलेशने नितीनला पकडून सतीशने मारहाण केली. पोलीस मांढरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही दोन्ही पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. 

आरोपींसोबत बाचाबाची झाली असता त्यावेळी मुलगी घटनास्थळवरून पळाली .आरोपी पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसताक्षणी नितीन ने वाडी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र नितीनचा फोन सूद्धा खाली पटकाविला.घटनेची गंभीयर्ता लक्षात घेऊन एपीआय देवीदास चोपडे आपल्या आठ दहा पोलीस कर्मचाऱ्यासह पोहोचले तर त्यांचा वर सुद्धा हमला केला.आरोपीनी पोलिसांवर दगडाने हमला केला तेव्हा दुसऱ्या आरोपीला दगड लागला.जेव्हा पोलिसांवर हल्ला होत आहे तेव्हा सामान्य माणूस कसा सुरक्षित असेल? याचा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उद्भवत आहे. 

वाडी शहरात असामाजिक तत्वाचा अड्डा बनला असुन असामाजीक तत्वाचे वर्चस्व असल्याचे घडलेल्या घटनेवरुन दिसून येते .पोलिसांचा परीसरात भय छूमंतर झाल्याने पोलिसांवरच थेट हल्ले केल्याची घटना समोर येत आहे. वाडी शहरातील पोलिसांना असुरक्षित वाटायला लागले आहे. आरोपींनी सीआर मोबाईल गाडीचा काच व इंडिकेटर फोडले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहीती पोलीसांनी दिली.

विशेष म्हणजे रविवारी नागपुरातील नाईक नगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीचा DJ बंद करायला गेलेल्या पोलिसांवर काही तरुणांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास हल्घला केला व जखमी केले होते.

फिर्यादी पोलिस शिपाई सुरेश मांढरे च्या तक्रारीवर आरोपी सतीश चन्ने व शैलेश काळे च्या विरुद्ध धारा ३५३, ३३२,३३६, ४२७,५०४,५०६, ३४ नूसार गुन्हा दाखल करून आरोपींना मंगळवार २३ जुलै रोजी न्यायालयात हजर केले. पुढील कार्यवाही एपीआय देवीदास चोपडे, एएसआय राजाराम ढोरे, पोलिस शिपाई संजय पांडे,राजेन्द्र बोराडे,शिपाई शिवशंकर रोठे,मोहशीन पठान ,मनोज शेलोटे, सुधाकर ऊईके करीत आहे .संबंधीत प्रकरणामध्ये आरोपी ऑटो चालकाच्या भावाला पोलिसांनी मारहाण केले असुन मंगळवार २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता ऑटो सेना, अखील भारतीय युवा परीषद तर्फे वाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिसांनी ऑटो चालकाच्या भावाला का मारले म्हणून चर्चा केली व न्यायाची मागणी केली.