नागपुरात किरकोळ वादावरून युवकाचा खून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जुलै २०१९

नागपुरात किरकोळ वादावरून युवकाचा खून

दोन आरोपीं पोलीसांच्या ताब्यात
नागपूर /अरूण कराळे:


मागील किरकोळ अपघाताचे कारण पुढे करत वादावादी करीत आरोपीने मृतक विक्की अरुण चव्हाण यांचा धारदार चाकूने वार केल्याने तो जागीच ठार झाला झाल्याने शहरात सर्वत्र खळबळ माजली आहे.

प्राप्त पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृतक विक्रम उर्फ विक्की अरुण चव्हाण वय २७ रा . शिवाजी नगर दख्खनी मोहला व फिर्यादी अभिषेक मुन्नाजी मेहरे वय १९ रा . टेकडीवाडी सोमवार १ जुलै रोजी रात्री १२ .३० वाजताच्या दरम्यान मोटार सायकलने मृतकाच्या घरी जाताना चावला कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील चतुर्भुज ले आउट येथील पॅरॉगान दुकानाच्या समोर आरोपी अर्पित नरेंद्र निभोरकर वय २६ रा . गोपी लाईन्स ट्रान्सपोर्ट जवळ चतुर्भुज ले आऊट शिवाजी नगर तसेच अभिषेक राजेश वऱ्हाडपांडे वय २२ रा . गोपी लाईन्स ट्रान्सपोर्ट चतुर्भुज ले आउट शिवाजीनगर वाडी यांनी मृतक व फिर्यादिची मोटर सायकल थांबवून मागील अपघाताच्या घटनेवरून वाद घालून हातबुक्यांनी मारहाण करून मृतकाचा मित्र अभिषेक मेहरे याच्या मानेवर व नाकावर चाकूने वार करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली तर मृतक विक्की चव्हाण यांच्या छातीवर व पोटाच्या डाव्या बाजूला चाकूचे सपासप वार करून त्याचा जागीच खून केला. फिर्यादीने मृतकाच्या भावाला घटनेची माहित देत स्थानिक खाजगी दवाखान्यात दाखल करून पोलिसांना माहिती दिली.

वाडी पोलीसांनी दोन्ही आरोपींना अट्टक करून अपराध क्रमांक २८३ / २०१९ कलम ३०२ , ३०७ , ३४१ , ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदाज चोपडे पुढील तपास करीत आहे.