महावितरणतर्फ़े ठिकठिकाणी वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जुलै २०१९

महावितरणतर्फ़े ठिकठिकाणी वृक्षारोपण

नागपूर/प्रतिनिधी:महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात वृक्षांची लागवड करण्यात येणार असून नागपूर परिक्षेत्रातील या मिहिमेचा शुभारंभ नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री दिलीप घुगल यांच्या हस्ते एमआयडीसी, वरोरा येथील 33 केव्ही उपकेंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपणाने करण्यात आले.

राज्य शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून या संकल्पात मोठे योगदान देण्यात येणार आहे. मागिल दोन वर्षी राज्य शासनाच्या या संकल्पात महावितरणने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असून त्यांतर्गत महावितरणच्या विविध कार्यालयात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 

मागिल दोन्ही वर्षी लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी प्रत्येक कर्मचा-याला एका झाडाच्या संगोपनाची जवाबदारी देण्यात आली होती, याहीवर्षी वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जवाबदारी कर्मच-यांना देण्यात आली आहे. 

एमआयडीसी वरोरा येथील महावितरणच्या उपकेंद्रात आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता हरिश गजबे, अधिक्षक अभियंते अशोक मस्के, सुहास मैत्रे यांच्यासह वरिष्ठ अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.