मुलीच्या जन्मदिवसानिम्मित कांबळे कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जुलै २०१९

मुलीच्या जन्मदिवसानिम्मित कांबळे कुटुंबीयांचा अनोखा उपक्रममायणी :- ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
           'भ्रूणहत्या थांबवा ,मुलगी वाचवा' हा शासकीय सामाजिक उपक्रम सर्वत्र अनेक उपक्रम राबवले जातात,याच संकल्पनेची जोपासना करीत 
अनफळे ता.खटाव येथील पत्रकार  स्वप्नील कांबळे व गौरी कांबळे या दाम्पत्यानी त्यांची कन्या 'अवनी'च्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने जि प शाळेत मोफत वहीपेन वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम राबवून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
             
अनफळे जि प शाळेत झालेल्या कार्यक्रमात चिमुकल्या "अवनी"च्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थिनींना वही व पेन वाटप करण्यात आले तसेच अनवीच्या हस्ते शाळा प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले .यावेळी नूतन पीएस आय जयश्री कांबळे ,राजेप्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष विशाल चव्हाण,मुख्याध्यापक सिद्धनाथ देशमुख,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे दत्ता कोळी,संदीप कुंभार, खिलारे मॅडम,संभाजी कांबळे,उत्तम वाघमारे,भारत कांबळे,सुरज पवार,बालाजी मोहिते,राहुल कांबळे शुभम बनसोडे यांचे सह कांबळे कुटुंबीय उपस्थित होते.
 . .  यावेळी मुख्याध्यापक देशमुख यांनी कांबळे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.