चारा आनण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा 3 दिवसानंतर नदीकाठी आढळला मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०१९

चारा आनण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा 3 दिवसानंतर नदीकाठी आढळला मृतदेह

 

भिवापूर/प्रतिनिधी 
नांद येथील बंडू संभाजी बांगरी वय अंदाजे (४५) हे शेळी व गाय यांचेसाठी शनीवार दि.२७/७/२०१९ ला चारा आणण्यासाठी घरून सकाळी १० वाजता गेले पण ते सांयकाळपर्यंत घरी वापस आले नसल्याने धावपळ केली व त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळपासुन  शोधाशोध केली पण मिळून आला नाही, तर नदी पलीकडे आनंदराव मिसाळ यांचे शेत असल्याने ते शेताकडे गेले पण सांयकाळच्यि सुमारास अंदाजे ५ ते ६ च्या सुमारास शेतातुन येतांना त्याला नदी काटावर मृत्यू व्यक्ती आढळून आली, अशी माहीती मिळाली. असता घरातील व शेजारी व्यक्ती गेली असता हे बंडु संभाजी बांगरी होय अशी ओळख दाखवून गावात चर्चा सुरू झाली. लागलीच नांद पोलीसांना बेपत्ता असल्याची खबर होतीच अशी तक्रार देण्यात आलु होती .तर ती व्यक्ती म्रुत अवस्तेतच नदी किनारी मिळून आली. त्याच्या पश्चात मुलगा, मुलगी पत्नी आहे.