29 जुलैला चंद्रपूरात जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जुलै २०१९

29 जुलैला चंद्रपूरात जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 
प्रियदर्शिनी नाट्यगृहात कार्यक्रम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जागतिक व्याघ्र साठी इमेज परिणाम
 राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित 29 जुलै रोजी सकाळी 9.30 ला चंद्रपूरातील प्रियदर्शीनी सभागृहात राज्यस्तरीय जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याघ्र दिनानिमित्त ‘अभिमान महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम योजनेचे पारितोषिक वनश्री पुरस्कार वितरण, शालेय मुलांना प्रशस्तीपत्रक वितरण आदी विविध कार्यक्रम होणार आहे.

चंद्रपूर वनवृत्तद्वारे आयोजित या कार्यक्रमामध्ये यावेळी वन्यजीवांचे छायाचित्र प्रदर्शन व पथनाट्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पुस्‍तकांचे विमोचन व सीडीचे विमोचन देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून प्रियदर्शिनी सभागृहामध्ये 29 जुलैला सकाळी 9.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्त मार्फत करण्यात आले आहे.