नागपुर-पोलिसांचा छापा पडल्याच्या भीतीने नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

नागपुर-पोलिसांचा छापा पडल्याच्या भीतीने नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:

नागपूर शहराच्या सीमावर्ती भागातील उमरेड रोड वरील बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्यात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये सोनू उर्फ इरफान शेख, जावेद इकबाल शेख यांचा समावेश आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून पोलिसांची नजर चुकवून सुनसान जागेवर जुगार खेळत असताना पोलिसांचा छापा पडल्याच्या भीतीने पळून जाण्याचा नादात 4 जुगरींनी मोठ्या नाल्यात उडी घेतली असता त्यातच दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.या घटनेत मृतदेह मिळाले असले तरी जुगारी असल्याबाबत संभ्रम असल्याचे सांगितल्या जात आहे, इतरही कारणाने नाल्यात दोघांचे मृतदेह वाहून येण्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे.