चंद्रपूरच्या बाबा आमटे स्मृती अभ्यासिका केंद्राचे छत कोसळले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जुलै २०१९

चंद्रपूरच्या बाबा आमटे स्मृती अभ्यासिका केंद्राचे छत कोसळले

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपुरात २ कोटी ६५ लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कर्मयोगी बाबा आमटे स्मृती अभ्यासिका केंद्राचे छत गुरुवारी कोसळले,या अभ्यासिका केंद्राचे छत कोसळल्यामुळे निकृष्ट कामाचा दर्जाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

काही दिवस आगोदर सर्वात महाग आणि देखणे बस स्थानक असलेल्या बल्लारपूर येथील बस स्थानकाचे छत एक नव्हे तर तब्बल दोन वेळा कोसळले, यावरून पुन्हा एकदा बसस्थानकाच्या बांधकामातील निकृष्ट दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला होता.

त्या पाठोपाठ पुन्हा वर्षभरातच आणखी दोन कोटी 65 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कर्मयोगी बाबा आमटे स्मृती अभ्यासिका केंद्राचे देखील छत कोसळल्याने हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते आहे, या कोसळल्याच्या त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी मात्र समोर मोठी दुर्घटना होऊ शकते.

या अभ्यासिकाच्या तळमजल्यावर ५० संगणक क्षमता असलेली ई- लायब्ररी सुरू आहे. २० हजार पुस्तके असलेल्या बुक रॅक्स विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतात.  
पोल्ट्रीफीड