चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०१९

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, संघाच्या वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात १ ऑगस्ट रोजी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. ग्रामीण वार्ता पुरस्कारांचे प्रथम मानकरी प्रा. डॉ. धनराज खोनोरकर (देशोन्नती, ब्रह्मपुरी), द्वितीय अमर बुद्धरपवार (पुण्यनगरी, नवरगाव), तृतीय डॉ. प्रशांत खुळे (हितवाद, वरोरा) तर प्रोत्साहनपर पुरस्कार आशिष गजभिये (लोकमत, खडसंगी), पंकज मिश्रा (नवराष्ट्र, चिमूर) यांचा समावेश आहे. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 पत्रकार संघाचे वतीने प्रायोजित मानवी स्वारस्याच्या विशेष पुरस्कारासाठी निलेश झाडे आणि संदीप रायपुरे (दै सकाळ, गोंडपिपरी ) यांच्या बातमीची निवड करण्यात आली. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित स्व. छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कारासाठी सुरेश वर्मा (नवभारत, चंद्रपूर) यांच्या बातमीची निवड करण्यात आली.

 इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. यात श्री. सचिन वाकडे (,मूल ) यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे. तसेच स्व. सुशीला राजेंद्र दीक्षित स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट वृत्तांकन (टी.व्ही.) पुरस्कार श्री. अन्वर शेख (जय महाराष्ट्र न्यूज) यांना जाहीर करण्यात आला आहे.

 रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा संयोजक जितेंद्र मशारकर, मोहन रायपूरे, बाळू रामटेके, राकेश गोविंदवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.