नागपुरात खड्यात बुडून ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जुलै २०१९

नागपुरात खड्यात बुडून ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर/ललित लांजेवार:

स्क्च्छतागृहाच्या बांधकामासाठी  ग्रामपंचायत परिसरातील खोदलेल्या खड्यात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नागपूर येथील दवलामेटी रामजी नगर येथे उघडकीस आली.

आर्यन नवदीप राऊत वय ५ वर्षे असे या मृत बालकाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळ पासून बेपत्ता होता.तो घरी परतला नसल्याने त्याचा शोध परिवारातील व इतर नागरिकांनी घेतला असता तो सापडला नसल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करीत वाडी पोलिसात तक्रार देण्यात आली,त्यानंतर मंगळवारी देखील सकाळी त्याचा शोध घेतल्या गेला,

दवलामेटी येथील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार समाजभवनाच्या आवारात स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यासाठी खड्डा तयार केला या खड्यात संततधार बरसणाऱ्या पावसाचे पाणी जमा झाले  व  त्याच पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आल्या नंतर आर्यनच्या पालकाने ग्रामपंचायतीला जिम्मेदार ठरवीले आहे.