1730 महिलांना कुक्कुटपालनातून मिळणार स्वयंरोजगार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जुलै २०१९

1730 महिलांना कुक्कुटपालनातून मिळणार स्वयंरोजगार

चांदा बांदा योजनेतून 9 कोटी 8 लाख रूपयांचा निधी मंजूर

चंद्रपूर /प्रतीनिधी:

चंद्रपूर जिल्ह्यातील अनुचित जाती, जमाती, परितक्त्या, विधवा, गरजू, सर्वसाधारण घटकातील महिलांना तसेच महिला बचत गटांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळावे. तसेच महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, याउद्देशाने चांदा ते बांदा योजनेतंर्गत कुक्कुटपालन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1730 महिलांची निवड करण्यात आली आहे. लवकरच त्यांना प्रशिक्षण देवून कुक्कुट पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे. चांदा बांदा योजनेमुळे 1730 महिलांच्या कुटूंबियांना शाश्वत रोजगारासह उत्पन्नाची हमी मिळणार आहे.
मिळवा कमी दिवसात जास्त फायदा फक्त NUTRIKRAFT  फीडवर 
राज्याच्या दोन टोकावरील चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा ही नाविण्यपूर्ण योजना चंद्रपूर जिल्हृयात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांचे व महिला गटाचे उत्पन्न वाढावे. तसेच त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देणाऱ्या विकास कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने कुक्कुट पालन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेसाठी 9 कोटी 8 लाख रूपये निधी मंजूर झाला असून 9 कोटी 7 लाख 73 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. 9 कोटी 7 लाख 73 हजार या निधीपासून लाभार्थ्यांना कुक्कुट पालन शेड, पिल्लांसाठी खाद्य, औषधी लसीकरण, कडकनाथ व देशी जातीच्या पिल्लांची खरेदी करून देण्यात येणार आहे. सदर योजना अनुसूचित जाती, जमातीसाठी 90 टक्के अनुदान असून लाभार्थी हिस्सा 10 टक्के आहे. तर सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के अनुदान असून 25 टक्के लाभार्थी हिस्सा आहे. 
मिळवा कमी दिवसात जास्त फायदा फक्त (पोल्ट्रीफीड)उपलब्ध
महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यातील चंद्रपूर, पोंभूर्णा, जिवती, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, नागभिड, सिंदेवाही, वरोरा, मुल, सावली, भद्रावती, ब्रम्हपूरी, चिमूर, बल्लारपूर या तालुक्यातील 1730 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 
मिळवा कमी दिवसात जास्त फायदा फक्त (पोल्ट्रीफीड)उपलब्ध 
यातील काही निवडक महिला लाभार्थ्यांना नागपूर येथील पशु व मस्त्य विद्यापीठ येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात महिलांना कोंबड्यांची निगा राखणे, पिल्लांना खाद्य देणे, पिल्लांची विक्री करणे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या महिला इतर लाभार्थी महिलांना मार्गदर्शन करणार आहे. लवकरच महिला व महिला बचत गटांतील महिलांना पिलांचे वाटप करण्यात येणार आहे.
मिळवा कमी दिवसात जास्त फायदा फक्त (पोल्ट्रीफीड)उपलब्ध 
या योजनेमुळे महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून चांदा ते बांदा योजनेच्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे 1730 महिला व त्यांच्या कुटूंबियांना रोजगार मिळून उत्पन्नात वाढ होणार आहे.