धानोली उपवनात शेतक-यास वाघाने केले ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ जून २०१९

धानोली उपवनात शेतक-यास वाघाने केले ठार

कारंजा परिसरात वाघाची दहशत
कारंजा-धानोली परिसरातील  शेतकरी दहशती खाली

उमेश तिवारी  (कारंजा घा.)
  -वर्धा व नागपूर  जिल्ह्याची  वन व राजस्व  सीमा  लगतच  वर्धा जिल्ह्यातील  कारंजा वन परिक्षेत्रातील   धानोली उप वनाच्या उंबरविहीरी वन कक्ष क्र ४९ लगतच्या धानोली निवासी ६२ वर्षिय विठोबा दसरू वडूले याचा या परिसरात वावर असलेल्या वाघाने १७जुन चे सकाळी ८ वाजताचे दरम्यान    विठोबाला त्याच्याच जंगला लगतच्या शेतात धुरा साफ करीत असताना पिंकी नावाच्या वाघिणीने हल्ला चढविला व वाघि नीने शेतकरी विठोबाला त्याच्या जंगला लगतचे शेतापासून अंदाजे ५० ते ६०  मिटर  दूर घनदाट जंगलात फरडफडत नेले मुलगा शेषराव वडुले वय ३८ शेतात दुसरीकडे काम करीत होता धुऱ्यावर येऊन पाहले असता वडील दिसले नाही आजूबाजूला शेतकऱ्यांना विचारणा केली सगळे मीळुन पाहिले असता वाहीन ही मृतदेहा जवळ बसली होती सगळ्यानि आवाज केला असता वाघीण जगलच्या दिशेने पळुन गेली. या वाघिणीचे वय ३ वर्षं आहे ही वाघिण या परिसरात १ वर्षा पासून वास्तव्यात आहे या पूर्वी ही वाघीण (बोर अभियारण) होती १ वर्षा पूर्वी मेट या गावच्या इसमावर हल्ला चढविला होता पण तो सूदयवाने बचावला होत.


  धानोली हे गाव  वर्धाजिल्ह्यात येत असून या जंगलाला लगतच नागपुर जाल्ह्याचे मासोद , कामठी ,धोतीवाडा;खापा, कावडीमेट चा भाग या जंगल भागाला लागूनच आहे। अनेक शेतकर्यांची शेती ही याच  भागात असल्याने  या  वाघीनीची दहशत  कारंजा तहसीलीतील  उंबर विहीरी, धानोली, मेट हिरजी नागझरी सह नागपुर जिल्ह्यातील कोंढाळी  भागातील खापा,धोतीवाडा, कामठी  मासोद ,मिनीवाडा या  भागातील शेतकर्यां मधे दहशतीचे वातावरन  आहे.

 मागील पाच दिवसा पासून  मासोद नजिक चे रामगड या भागात रात्री चे वेळी  वाघाने धुमाकूळ घालयता आहे। अशी माहीती कामठी चे शेतकरी  व मासोद चे शेतकरी किनकर  व प्रकाश बारंगे यांनी कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारक एफ आर आजमी यांना दिली ।तेंव्हा या भागात वनरक्षक  व वन अधिकारी रात्र गस्त करत असल्याचे ही सांगितले असले तरी १७जुन चे धानोली येथील शेतकर्याला  पिंकी वाघिणीने ठार मारल्याने लगतच्या शेतकर्यांमधे ही दहशत पसरली आहे. मृतक शतकऱ्या जवळ अडीच एकर शेती आहे पत्नी एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. घटनास्थळी बोर धरण वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस. राठोड आपल्या टीम सह उपस्थित होते त्याच प्रमाणे कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेट्ये आपल्या टीम सह उपस्थित होते. शासणाच्या नियमाप्रमाणे मृतकाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा नियम आहे. पोस्टमार्डम झाल्या नंतर शव परिवाराला देण्यात येईल. या भागात वाघ वाघिणीचा जोडी आहे वाघाचे नाव युवराज व वाघिणीचे नाव पिंकी असे आहे.