महापौर नंदा जिचकार जाणार फ्रान्सला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जून २०१९

महापौर नंदा जिचकार जाणार फ्रान्सला


नागपूर,ता. २४ : नोव्हेंबर २०१९ च्या अखेरीस ब्राझील येथे युनायटेड नेशन सेक्रेटरी जर्नल क्लायमेट ॲक्शन समीट आणि कॉप-२५ (COP-25)चे आयोजन करण्यात येत आहे. समीटमध्ये यशस्वी सहभागाच्या नियोजनाच्या दृष्टीने पॅरिस (फ्रान्स) येथे जीकॉमच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी महापौर नंदा जिचकार मंगळवारी (ता. २५) फ्रान्सला रवाना होता आहे.

महापौर नंदा जिचकार ह्या ग्लोबल कोव्हेनन्ट ऑफ मेयर्स (जीकॉम) या परिषदेवर दक्षिण आशियातून एकमेव बोर्ड सदस्य आहेत. २६ आणि २७ जून रोजी जीकॉमच्या संचालक मंडळाची बैठक असून त्यात त्या सहभागी होतील. सदर बैठकीत नोव्हेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या परिषदेतील विषय आणि नियोजनाबाबत चर्चा होणार असून त्यात त्या सहभागी होतील.