‘ग्रीन अर्थ’ची वृक्षदिंडी २३ जूनपासून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ जून २०१९

‘ग्रीन अर्थ’ची वृक्षदिंडी २३ जूनपासून

‘एक गाव, एक पाणवठा, एक जंगल’ मध्यवर्ती संकल्पना
नागपूर विभागात करणार वृक्षारोपण व जनजागरण

वाहनांची, कारखान्यांची वाढती संख्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, दिवसागणिक वाढत चाललेले तापमान आणि परिणामस्वरूप घटत चालली पाण्याची पातळी, सततची होत असलेली वृक्षतोड यामुळे पृथ्वीसमोर फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. वेळीच उपाय योजले नाही तर भावी पिढील अत्यंत भयानक परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. ही बाब ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाच्या विकासाला एकीकडे गती देत असतानाच दुसरीकडे निसर्गाचे संवर्धन करण्याचा संकल्प हाती घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणाचा संकल्प घेत ‘जलयुक्त शिवार’सारखी अभिनव कल्पना मांडली आणि ती कसोशीने त्यांनी राबविली. राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील १ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात येते. दोन ते तीन हजार किलोमीटरचा प्रवास करीत गावोगाव वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश वृक्षदिंडींच्या माध्यमातून दिला जात आहे. यात मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्थांनीदेखील सहभाग नोंदवला आहे.
यंदाही आमदार अनिल सोले यांच्या ‘ग्रीन अर्थ ऑर्गनाझेशन’ च्या माध्यमातून नागपूर विभागात म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २९ जून दरम्यान संपूर्ण नागपूर विभागात जनजागृती अभियान राबविले जाणार असून वृक्षारोपणाचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार नागो गाणार, आमदार गिरीश व्यास यांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.
वृक्षदिंडीचा उद्घाटन सोहळा रविवार, २३ जून रोजी सकाळी १० वाजता वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार असून वृक्षदिंडीचे उद्घाटन वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ, परिणय फुके यांच्या हस्ते होणार आहे. वन विभागाचे प्रधान सचिव विकास महात्मे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, आंजीचे सरपंच जगदीश संचेरिया, वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांच्यासह आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी खासदार विजयराव मुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार दादाराव केचे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष संगीता शेंडे, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पुलगावच्या नगराध्यक्ष शितल गीते, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुख्य वनसंरक्षक-प्रादेशिक पी. कल्याणकुमार,वर्ध्याचे जिल्हाधिकारी भिमनवार, सीईओ सचिन आंबोसे, पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, उपवनसंरक्षक डॉ. सुशील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, राजेश बकाणे, डॉ. गिरीश गोडे व सुधीर दिवे, कौस्तुभ चॅटर्जी, कांचन नांदूरकर, जयश्री गफाट, दिलीप रघाटाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २९ तारखेपर्यंत नागपूर विभागातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण व जनजागरणाचा कार्यक्रम होणार असून त्याचे वेळापत्रक सोबत जोडलेले आहे. वृक्षदिंडीचे संयोजक आशीष वांदिले (मो. नं. 94231 03060) तर वर्धा येथील सहसंयोजक सुनील गाफट (मो. नं. 9420062950) आहेत. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा. प्रसारमाध्यमांना greenearth.news19@gmail.com या मेल आयडीवरून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती वेळोवेळी पुरविली जाईल.
……..
असा आहे वृक्षदिंडीचा मार्ग
  • रविवार, २३ जून, सकाळी १० वाजता : उद्घाटन आंजी (मोठी), विरुळ, पुलगाव, देवळी, वर्धा, सेवाग्रामला मुक्काम.
  • सोमवार, २4 जून, सकाळी ९ वाजता : सेवाग्राम, समुद्रपूर, जांब, हिंगणघाट, वरोरा, भद्रावती, तडाळी, चंद्रपूर येथे मुक्काम.
  • मंगळवार, २५ जून, सकाळी ९ वाजता : चंद्रपूर, मूल, चार्मोशी, गडचिरोली येथे मुक्काम.
  • बुधवार, २६ जून, सकाळी ९ वाजता : गडचिरोली, आरमोरी, वडसा, अर्जुनी मोरगाव, नवेगाव, सडक अर्जुंनी, गोरेगाव, गोंदिया येथे मुक्काम.
  • गुरूवार, २७ जून, सकाळी ९ वाजता : गोंदिया, तिरोडा, तुमसर, कांद्री, रामटेक, मनसर, पारशिवनी, सावनेर, पारडसिंगा येथे मुक्काम.
  • शुक्रवार, २८ जून, सकाळी ९ वाजता : पारडसिंगा, काटोल, कळमेश्वर, हिंगणा, हिंगणा टी पॉइंट, लक्ष्मीभुवन चौक, कमाल चौक, गोळीबार चौक, डॉ. आंबेडकर चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, कॉटन मार्केट, रवीभवन येथे मुक्काम.
  • शनिवार, २९ जून, सकाळी ८ वाजता : सक्करदरा चौक, उमरेड येथे समारोप.

…….