आर्थिक जनगणना 2019 सर्वे लवकरच सुरू होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ जून २०१९

आर्थिक जनगणना 2019 सर्वे लवकरच सुरू होणार

युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी - एकदिवसीय कार्यशाळा  नागपूर :  आर्थिक जनगणना 2019 सर्वे लवकरच नागपूर जिल्ह्यात सुरू होणार आहे  जिल्हयात मोठ्या प्रमाणात गावा गावात सीएससी सेंटर चे जाळे आहे जनगणनेच्या कामाकरिता शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे यावेळी जनगणनेचे काम करण्याकरिता शासनाकडून सीएससी सोबत करार झालेला आहे जनगणनेचे काम कॉमन सर्विस सेंटर करणार आहे यामध्ये कॉमन सर्विस सेंटर संचालक यांची महत्वपुर्ण भूमिका राहणार आहे सीएससी च्या माध्यमातून आर्थिक जनगणना सुरू करण्याकरिता पहिले  सीएससी संचालकाला ईमुरेटर, सुपरवायझर  यांचे ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे  ऑन लाईन परीक्षा पास झाल्या नंतर ईमुरेटर ,सुपरवायझर आर्थिक जनगणनेचे काम करण्याकरिता पात्र ठरतील यासाठी नागपूर जिल्ह्यात सीएससी संचालकांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे कामाचे पुर्ण प्रशिक्षण आर्थिक जनगणना करिता बचतभवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे  संपन्न झाले जिल्हातील सीएससी संचालकांना एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली यावेळी मार्गदर्शक व प्रमुख उपस्थिती अनिल पाटील एन.एस.एस.ओ ,रश्मी पाटील आर्थिक जनगणना विभाग राजु कळमकर, जिल्हा संख्याकी अधिकारी, थापाजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते सीएससी कडुन सीएससी चे निलेश कुंभारे, जिल्हा समनव्यक प्रशांत झाडे, उमेश मानमोडे, इंद्रजित सिंग, आकाश गायकवाड,चेतन मुळे आदी जिल्ह्यातील सीएससी संचालक उपस्थित होते यावेळी कार्यशाळेचे संचालन जिल्हा समनव्यक प्रशांत झाडे यांनी केले.