बुटीबोरीत भाजपचा दणदणीत विजय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जून २०१९

बुटीबोरीत भाजपचा दणदणीत विजय

नगरपरिषद निवडणूक :
 राजेश गौतम पहिले नगराध्यक्ष; भाजपला १६ तर राष्ट्रवादीला दोन जागा; कॉँग्रेसला भोपळा बुटीबोरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळविण्याची भाजपची घौडदोड सुरुच आहे. नागपूर जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या बुटीबोरी नगर परिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह १६ जागावर भाजपने दमदार यश मिळविले आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे राजेश (बबलु) मनोरंजन गौतम यांनी ६ हजार ९४७ मते मिळवित राष्ट्रवादीचे रामनारायण (बल्लू) दशरथ श्रीवास यांचा ३ हजार ८६१ मतांनी पराभव केला. श्रीवास यांना ३०८६ मते मिळाली. काँग्रेसचे जाकीर (बाबू) सलाम पठाण यांना ३०२४ मते मिळाली.

बुटीबोरी नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. यात नगराध्यक्ष आणि नऊ प्रभागातील १८ नगरसेवकांच्या निवडीसाठी एकूण २३,६६० मतदारांपैकी १४,७५७ मतदारांनी (६२.१० टक्के) मतदानाचा हक्क बजाविला होता. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत झाली. येथे भाजप आणि सेनेची युती होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्याने भाजप-सेना युतीला विजय खेचण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीला येथे केवळ दोन जागावर यश मिळाले. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला आहे. प्रदेश कॉँग्रेसचे सचिव मुजीब पठाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने येथे निवडणूक लढविली होती. त्यांचे बंधू जाकीर पठाण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. भाजपकडून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी किल्ला लढविला. सेनेशी युती करण्यापासून तर उमेदवार जाहीर करेपर्यंत भाजपचे नियोजन होते. बुटीबोरीत कॉँग्रेस सुरुवातीपासूनच एकाही होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ही निवडणूक एकत्र लढावी यासाठी जिल्ह्यातील एकाही मोठ्या नेत्याने पुढाकार घेतला नाही. शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांनी ताकद लावली. त्यांना दोन जागा मिळविण्यात यश आले.