नारंडा येथे ग्रामपंचायत भवन करीता २० लक्ष निधी मंजुर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जून २०१९

नारंडा येथे ग्रामपंचायत भवन करीता २० लक्ष निधी मंजुर

जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा पुढाकार
 भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या मागणीला यश 
कोरपना/प्रतिनिधी:

         कोरपना तालुक्यातील नारंडा येथील जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत भवन करीता २० लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी नारंडा येथे ग्राम पंचायत भवन मंजूर केले आहे.
         नारंडा येथील लोकसंख्या जवळपास ३००० हजार असून नारंडा येथे असून गावामध्ये आद्यवत ग्राम पंचायत उपलब्ध नव्हते नारंडा येथील ग्रामपंचतीचा कारभार जुन्या समाजभवनमध्ये चालत होता त्यामुळे ग्रामपंचतीचे प्रशासकीय कामकाज चालवित असताना एकाच खोलीमध्ये चालवावा लागत होता त्यामुळे सरपंच,सचिव,संगणक चालक,मासिक सभा या करिता स्वतंत्र खोल्या नसल्यामुळे सर्व कामकाज एकाच खोलीत चालवावे लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज करीत असताना सोयीचे ठरत नव्हते.तसेच नागरिकांना गौरसोयीचा सामना करावा लागत होता,
         या सर्व बाबीची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे मागणी व पाठपुरवठा केला होता,त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी नारंडा येथे जनसुविधा योजने अंतर्गत २०लक्ष रुपये निधीचे ग्रामपंचात भवन मंजूर केले आहे.
सदर ग्रामपंचायत भवन मंजूर झाल्यामुळे नारंडा येथे नवीन प्रशस्त ग्रामपंचायत ईमारत निर्माण होणार आहे.नारंडा येथे ग्रामपंचायत भवन मंजूर केल्याबद्दल भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला.व ग्रामपंचायत भवन मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध