घराच्या समोर मोठा जिवघेना खड्डा करनाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जून २०१९

घराच्या समोर मोठा जिवघेना खड्डा करनाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करा

आदिवासी कुटुंबियाने केली ग्रामपंचायतकडे मागणी
ग्रामपंचायतीचा दुर्लक्ष
जिवघेना खड्डा असल्याने पिढीत कुटुंब झाले भयभित
मुल/प्रतिनिधी:

मुल तालुक्यातील चितेगाव येथे माला पेंदोर , कामीना येरमे यांच्या घरासमोर तेथिल सुर्यभान येरमे नामक व्यक्तीने जिवघेना खड्डा करुन कचरा टाकत आहे यामुळे त्या कुटुंबाच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.

सुर्यभान हा नेहमीच वाद घालत असुन खुनेरी स्वभावाचा असल्याचे गावकरी सांगत आहे. खड्डा केलेल्या जागेवर ग्रामपंचायतीचे रोड असुन त्या जागेवर खड्डा केला असतांना ग्रामपंचायत अजुनही कार्यवाही का केली नाही असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे. 

खड्डा केल्याने त्या कुटुंबावर पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण आहे. तसेच रात्रो घरी जातांना अंधारात त्या खड्यात पडुन जिव जाण्याची शक्यता आहे. घरासमोर खड्डा करुन त्या खड्यात रोज केरकचरा टाकत ग्रामस्वच्छता अभियानाचा तीन तेरा सुर्यभार करीत आहे. 

सुर्यभान येरमे हा खुनेरी प्रवृत्तीचा असल्याने अनेकदा जिवे मारण्यासाठी अंगावर धावुन येत असतो असे गावकरी सांगतात. पेंदोर कुटुंब कामासाठी बाहेर गावी गेल्याचा डाव साधुन तो खड्डा केला आहे. पेंदोर कुटुंब गावाकडे परत आल्यानंतर खड्डा बुजविण्यासाठी सांगितले असता त्यांनाच जीवे मारण्याची धमकी देत आहे. 

सदर बाबा ग्रामपंचायतीला कळविले असता ग्रामपंचायतचे सचिव अजुनही कोनतीही कार्यवाही सुर्यभानवर केलेली नाही. यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे. सदर खड्डा बुजवुन तात्काळ सुर्यभान येरमे या इसमावर कार्यवाही करावी अशी मागणी पेंदोर कुटुंब केली आहे.