थोड्याच वेळात चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळाव्याला सुरवात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०१९

थोड्याच वेळात चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळाव्याला सुरवात

उमरेड/प्रतिनिधी:

पीक कर्ज वाटप साठी इमेज परिणाम
नागपुर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून शनिवारी ता १५ रोजी सकाळी १० वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत चांपा ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे.

उमरेड तालुक्यातील चांपा येथे खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी केले आहे .

नागपुर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून शनिवारी उमरेड तालुक्यातील चांपा गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहे .

शनिवारी चांपा येथील परिसरातील चांपा , उटी , हळदगाव , परसोडी , तिखाडी , उमरा, दुधा , सायकी , ड्व्हा खापरी , फूकेश्वर , सुकळी , मांगली , खापरी कुरडकर , हेटि , या सर्व गावातील शेतकऱ्यांनी चांपा ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी मेळावा होणार आहे. 

शेतकºयांना २०१९ या वर्षीच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कुठलीही अडचण जाऊ नये, बँक व अन्य यंत्रणांकडून पूर्ण सहकार्य मिळावे, यासाठी संपूर्ण प्रशासन आता शेतकºयांच्या भेटीला सज्ज असणार आहे.

शनिवारी चांपा ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांना आवश्यक असणारे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया चांपा ग्रामपंचायत कार्यालयातच पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकºयांनी चांपा ग्रामपंचायत कार्यालयात येताना सातबारा (अद्ययावत) गाव नमुना ८-अ, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, दोन पासपोर्ट छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला तहसील कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यातील अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहायक निबंधक, संवर्ग विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव, तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या सर्व यंत्रणेवर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष घालणार असून शेतकºयांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. आज होणाºया मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
नागपुर जिल्ह्यातील खरीप पीक कर्जवाटपासाठी शनिवारी चांपा ग्रामपंचायतच्या ठिकाणी होणाºया मेळाव्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम यांनी केले आहे. नागपुर जिल्हा प्रशासनाने हा अभिनव प्रयोग केला असून त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येत प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना या हंगामामध्ये सक्रियपणे आर्थिक मदत व्हावी, योग्य ते पीक घेण्याची त्यांना सुलभता व्हावी, यासाठी नागपुर जिल्हा प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे चांपा गावाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून खरीप पीक कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
टीप :- शेतकऱ्यांनी मेळाव्यात येतेवेळी आवश्यक कागदोपत्री उदा.जमीनीचा सातबारा ,नमूना आठ, बँक पासबुक ,आधारकार्ड सोबत आणावे .

महत्वाचे ज्या शेतकऱ्यांजवळ बँकेचे पासबुक नसेल अश्या शेतकऱ्यांनी आधारकार्ड , तिन फोटो , ग्रामपंचायत रहिवासी दाखला सोबत आणावे .जणेकरून चांपा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाव्यात लाभ देता येईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती .

सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क :९१७५९३७९२५