ट्रेलर,टिप्पर,कारमध्ये जोरदार धडक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जून २०१९

ट्रेलर,टिप्पर,कारमध्ये जोरदार धडक

अपघातात ट्रक चालकाचा म्रुत्यु 

कार चालक गंभीर जखमी

चांपा/प्रतिनिधी:उमरेड नागपुर महामार्गावर उटी गावाजवळील भिवापूर फाट्यावर ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेला ट्रेलर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे पाठीमागुन भरधाव ट्रकने ट्रेलर ला जोरदार धडक दिल्याने टिप्परचा समोरील भाग  चेंदामेंदा झाला.ट्रेलर व टिप्पर  मध्ये प्रत्येकी दोन व्यक्ती तर कारमध्येसुध्दा  दोन व्यक्ती बसल्या होत्या .


ही घटना रात्री १०:३०च्या दरम्यान उमरेड तालुक्यातील उटी भिवापूर नर्सरी येथील नागपुर ते उमरेड महामार्गावर घडली .या अपघातात ट्रेलर क्रं एम .एच ३४बि .जि २४४१.हा  चंद्रपूर येथील खाणीमधून कोळसा भरून नागपुर येथे जात होता .नागपुर वरून उमरेड कड़े वेगाने जात असलेली भरधाव कार क्रं एम .एच ४९यू २९५२.ने समोरून येत असल्याने ट्रेलरला धडक दिली. कार व ट्रेलर यांच्यात धडक झाल्याने ट्रेलरने अचानक ब्रेक मारल्यामुळे कारला  वाचवण्यासाठी ट्रेलर अनियंत्रित झाल्याने पाठीमागुन वाळू भरून भरधाव  येत असलेला टिप्पर क्रं एम एच ३३टी ३४४४ही  अचानक ट्रेलरवर धडकला व  टिप्पर  चालकाचा टिप्परवरून ताबा सुटला व ट्रेलर ला जोरदार धडक दिली.


यात कार.टिप्पर.ट्रेलर हे एकमेकांना भिडले व यात टिप्पर चालक प्रमोद शंकरराव कुडवले वय ३९ रा .किसाननगर ता .सावली जि .चंद्रपूर याचा  घटनास्थळीच म्रुत्यु झाला .कार चालक सोबत कारमालक  विजय नगर नाईक रा उमरेड हे अपघातात गंभीर जखमी झाले .अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली .उमरेड नागपुर महामार्गावर ट्राफिक जाम झाले होते .

अपघात अत्यंत भीषण असल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना उटी भिवापूर नर्सरीजवळ अपघात झाल्याची माहिती दिली.कुही पाचगाव चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत , व सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक भोयर , पो .कॉ .गजानन करे , या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले .टिप्परमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले असून टिप्पर  चालकांचा घटनास्थळीच म्रुत्यु झाला .व नागरिकांनी तत्काळ कारमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढून गंभीर जखमी झालेल्या कार चालक व मालक विजय नाईक या दोन्ही रुग्णांना नागरिकांनी तत्काळ उमरेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले .असून पोलिसांनी आरोपी ट्रेलर चालक हा घटनास्थळावरुन फरार झाला .आरोपी ट्रेलर चालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत करीत आहे.