चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०१९

चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळावा

आयडीबिआय बँकेमार्फत चांपा परिसरातील ८५शेतकऱ्यांना ६८लक्ष २८हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले

चांपा/प्रतिनिधी:

नागपुर  जिल्ह्यात पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला. शनिवारी ता १५ रोजी सकाळी १० वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कर्ज वाटपाचे कार्यक्रम सुरू होते . चांपा ग्रामपंचायत कार्यालयात १८शेतकऱ्यांना १५लक्ष ८२हजार रुपयांचे पीक कर्ज आयडीबिआय बँकेने वाटप केले .

  उमरेड तालुक्यातील चांपा येथे खरीप पीक कर्ज वाटप मेळावा चांपा ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला.या मेळाव्यामध्ये आयडीबिआय  बँकेचे शाखा व्यवस्थापक अश्विनी डोंगरे रश्मी रामटेके , महसूल विभागाचे,के .एन .शेटे ,  सहकार विभागाचे जी .एस ठाकरे , व्ही. पी.भोज , यू.डी.पाटील .कृषि विभागाचे एम .के .गुजर चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार , ग्रामसेवक सुनील तायवाडे  इत्यादी अधिकाऱ्याच्या उपस्थित चांपा परिसरातील शेतकऱ्यांना  पीक कर्ज मंजूर केले आहे .

नागपुर  जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून शनिवारी उमरेड तालुक्यातील चांपा गावांमध्ये ग्रामपंचायत  कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय चांपा येथे शेतकऱ्यांना  थेट पीक कर्ज वाटपाचा मेळावा घेण्यात आला .

 चांपा  परिसरातील चांपा , उटी , हळदगाव , परसोडी , तिखाडी , उमरा, दुधा , सायकी , ड्व्हा खापरी , फूकेश्वर , सुकळी , मांगली , खापरी कुरडकर , हेटि ,  या सर्व गावातील शेतकऱ्यांनी चांपा ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी मेळाव्यात आपली उपस्थिती दर्शवली व पीक कर्ज मेळाव्याचा लाभ घेतला आहे.  
शेतकºयांना २०१९ या वर्षीच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कुठलीही अडचण जाऊ नये,म्हणून चांपा परिसरातील शेतकऱ्यांना ६८ लक्ष २८ हजार रुपयांचे पीक कर्ज आयडीबिआय बँकेतर्फे वाटप करण्यात आले.
सहकार विभागामार्फत शेतकरी  पीक कर्ज वाटप मेळाव्यात रामदास आंबुलकर रा खापरी या शेतकऱ्याला ८३,हजार रुपये तर दुधाराम बकाल रा .खापरी यांना ९५हजार रुपयांचे कर्ज वाटप केले .आयडीबिआय बँकेने चांपा परिसरातील शेतकरी सेवक मडावी रा .उटी , दयाराम बाराहाते रा .सुकळी , ललिता घोसले रा .चांपा , धोंडाबाई मसराम रा .फूकेश्वर आदी शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर केले .
व शेतकऱ्यांना आवश्यक असणारे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया चांपा ग्रामपंचायत  कार्यालयातच पूर्ण करण्यात आली आहे.  

या मेळाव्याला तहसील कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यातील अधिकारी, , सहायक निबंधक, संवर्ग विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव, तालुक्यातील संबंधित आयडीबिआय राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते . या सर्व यंत्रणेवर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष  असून चांपा येथे पीक कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.