दवलामेटी येथे सातवी आर्थिक जनगणनाचे प्रशिक्षण व कार्यशाळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जून २०१९

दवलामेटी येथे सातवी आर्थिक जनगणनाचे प्रशिक्षण व कार्यशाळा

दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे  वितरण

नागपूर / अरुण कराळे: भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय अंतर्गत ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात येणारी सातवी आर्थिक जनगणना मोबाईल टॅबलेट द्वारा करण्यात येईल.


नागपुर तालुक्यातील दवलामेटी येथे ग्रामपंचायत भवन येथे शनिवार २९ जुन रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . तसेच भारत सरकारच्या अपंगत्व व स्किल डिजिटल इंडिया अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व कार्यशाळेचे उदघाटन नागपूर ग्रामीणचे तहसीलदार  मोहन टिकले यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख  मार्गदर्शक म्हणून जिल्हा व्यवस्थापक प्रशांत झाडे, उमेश मानमोडे,तंत्रज्ञान विभाग चेतन मुळे,अमन वटे यांनी कार्यशाळेला संबोधित केले.यावेळी उमेश मानमोडे यांनी उपस्थित पर्यवेक्षक व सुपरवायझर आणि कॉमन सर्विस सेंटर संचालकांना सातव्या आर्थिक जनगणनेची माहिती दिली . ऑगस्ट महिन्यात सातवी आर्थिक जनगणना सुरू होणार आहे.आर्थिक जनगणनेच्या कामाकरता सुशिक्षित बेरोजगारांना मानधन देऊन मोबाईल टॅबलेट द्वारे जनगणनेत सहभागी झाले आहे.ब्लॉक मधील सर्व घरे,मकान,दुकान,छोटे-मोठे दुकानदार आर्थिक जनगणनेत जोडले जाणार आहे. जनगणनेचे संपूर्ण कार्य पेपरलेस आहे. ही योजना कॉमन सर्विस सेंटर द्वारा होणार आहे. कॉमन सर्विस सेंटर संचालक सुपरवायझर म्हणून काम पाहतील.याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी विष्णू पोटभरे, सरपंच आनंदाताई  कपनीचोर, प्रशांत केवटे,प्रमोद सरोदे, रश्मी पाटील, हेमलता खैरकर,रागिनी चांदेकर,प्रभा थोरात, कल्पना गवई,प्रज्ञा वानखडे, मंगला लोखंडे,मीरा राजे,अनामिका पाटील,ज्योती निकुडे,हर्षल चौधरी,इशिका गोंडाणे,उषा शेंडे, मंगला तिरपुडे,प्रणय मेश्राम,प्राची मानकर,ज्योती आगासे,रीमा बागडे,वनिता उके,संगीता बोरकर उपस्थित होते .प्रशिक्षण व कार्यशाळा यशस्वितेकरीता स्नेहा पटले, धनश्री उजाडे , नरेंद्र गजभिये, चेतन लाकडे यांनी  परिश्रम घेतले .


 कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महासेवा केंद्राचे संचालक रवींद्र खैरकर यांनी केले .